शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

खतरनाक Video! बेटकुळ्या फुगवायला गेला चिनी रणगाडा; शक्तिप्रदर्शनावेळी बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 08:23 IST

चिनी लष्कराच्या युद्धसामग्रीवर प्रश्नचिन्ह उपस्थित; अवघ्या ३० सेकंदांत रणगाडा बुडाला

बीजिंग: आपल्या विस्तारवादी धोरणामुळे जवळपास सर्वच शेजारी देशांशी सीमावाद उकरून काढणाऱ्या चीनला शक्ती प्रदर्शनादरम्यान मोठा धक्का बसला आहे. लष्करी क्षमतेच्या जोरावर शेजारी देशांना धमकावणाऱ्या चिनी सैन्याच्या युद्ध सरावाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चिनी लष्कराचा अँफिबियस रणगाडा पाण्यात बुडताना दिसत आहे. विशेष म्हणजे हा रणगाडा जमीन आणि पाण्यात अतिशय सक्षम असल्याचा दावा केला जात होता. मात्र व्हायरल व्हिडीओमध्ये या दाव्याची चांगलीच पोलखोल झालेली दिसून येत आहे.चीन तैवानवर हल्ला करण्यासाठी जलमार्गाचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी अशाच प्रकारच्या पाण्यातूनही आगेकूच करू शकणाऱ्या रणगाड्यांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र अँफिबियस रणगाड्यानं जलसमाधी घेतल्यानं त्याच्या दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. पाण्याखाली राहून शत्रूची प्रतीक्षा करायची आणि आवश्यकता भासल्यास अचानक हल्ला करायचा, यासाठी अँफिबियस रणगाडा वापरला जातो. शत्रूच्या वाहनांना, बोटींना नदी पार करण्यापासून रोखण्याचं कामदेखील हा रणगाडा करू शकतो. अँफिबियस रणगाडा अनेकार्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. मात्र त्यामध्ये कंत्राटदारानं निकृष्ट दर्जाचं स्टील वापरल्याचा आरोप होत आहे. त्यामुळेच त्यानं युद्धसराव सुरू असताना अचानक जलसमधी घेतली. यामुळे चिनी लष्कर वापरत असलेल्या युद्धसामग्रीबद्दल प्रश्न उपस्थित झाले आहेत. चिनी लष्कर वापरत असलेल्या युद्ध साहित्याची गुणवत्ता किती असा सवाल निर्माण झाला असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचीदेखील चर्चा आहे.दक्षिण चिनी समुद्रातील काही बेटांवर चीनकडून दावा सांगितला जातो. या बेटांवर मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आहे. खनिज तेल, उर्जा संपदा, माशांचं प्रमाण अतिशय जास्त असलेल्या भागांवर चीननं वारंवार दावा केला आहे. त्यामुळेच या भागात चिनी नौदलाची जहाजं, पाणबुड्या टेहळणी करत असतात. या भागात अनेक देशांशी चीनचे खटके उडाले आहेत. 

टॅग्स :chinaचीन