बीजिंग : चिनी सैनिकांच्या चुमारमधील घुसखोरीनंतर चिनी माध्यमांनी भारत चिनी नेत्यांच्या दौ:यादरम्यान लक्ष विचलित करण्यासाठी सीमेवर अशा घटनांना चिथावणी देतो, असा आरोप केला आहे.
चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्लीतील भेटीनंतर चिनी तज्ज्ञ गटांनीही चर्चेमध्ये अधिक लाभ मिळावा याकरिता भारताने आक्रमक धोरण अवलंबले असल्याचे म्हटले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने जिनपिंग - मोदी यांच्या चर्चेवरील वृत्त देताना लडाखमधील घटनांचा प्रथमच उल्लेख केला आहे. या वृत्तपत्रने चुमार भागात चिनी आणि भारतीय सैनिकांत निर्माण झालेल्या तणावावरील भारतीय वृत्तपत्रंत आलेल्या वृत्तांचा हवाला दिला आहे. मोदी यांनी सीमेवर सध्या घडत असलेल्या घटनांसंदर्भात जिनपिंग यांच्याकडे बुधवारी गुजरातेत चिंता व्यक्त केली. त्यानंतर नवी दिल्लीतील चर्चेतही गुरुवारी हा मुद्दा पुन्हा उपस्थित केला, असे ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे. चुमारमधील घटनेवर तत्काळ नियंत्रण मिळविण्यात आले आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते होंग लेई यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना गुरुवारी म्हटले होते. मात्र, ग्लोबल टाइम्सने एका अज्ञात निरीक्षकाच्या हवाल्याने चिनी नेत्याच्या दिल्ली दौ:यावरून लक्ष वळवण्यासाठी भारत सीमेवर तणाव निर्माण करीत असल्याचा आरोप केला. कोणत्याही चिनी नेत्याच्या भारत भेटीपूर्वी सीमेवरील तणाव वाढतो. गेल्यावर्षी असाच प्रकार झाला होता.