शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता पाकिस्तानने आपला समुद्र चीनला 'विकला', ड्रॅगनची 20 जहाजे मासेमारीसाठी पोहोचली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 10:53 IST

दुसरीकडे पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर कराचीमध्ये इम्रान सरकार आणि चीनविरोधात जोरदार निषेध सुरू झाला आहे.

चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरच्या माध्यमातून चीननंपाकिस्तानमध्येच आपली वसाहत तयार केली  आहे. पाकिस्तानने आता आपला समुद्र ड्रॅगनच्या स्वाधीन केला आहे. पाकिस्तानने आता चिनी जहाजांना आपल्या विशेष आर्थिक विभागात मासे पकडण्याची परवानगी दिली आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारच्या या निर्णयानंतर कराचीमध्ये इम्रान सरकार आणि चीनविरोधात जोरदार निषेध सुरू झाला आहे.पाकिस्तान सरकारच्या या निर्णयामुळे कराचीतील लोक संकटात सापडले आहेत आणि हजारो मच्छिमार चीनला विरोध करीत आहेत. पाकिस्तान सरकारच्या परवानगीनंतर खोल समुद्रात मासेमारी करण्यास सक्षम 20 ट्रॉलर्स चीनहून कराची येथे दाखल झाले आहेत. या चिनी जहाजांना सिंध आणि बलुचिस्तानच्या किनारपट्टीवर मासेमारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. पाकिस्तानी मच्छिमारांना त्यांच्या भागात मासे पकडण्यासाठी चिनी जहाजे नको आहेत.या पाकिस्तानी मच्छिमारांचे म्हणणे आहे की, चिनी जहाजं मोठ्या प्रमाणात मासे पकडू शकतात, ज्यामुळे नंतर समुद्री यंत्रणा बिघडेल आणि त्याचा फटका त्यांना सहन करावा लागेल. पाकिस्तान फिशर फोक फोरमच्या अहवालानुसार किनारपट्टी भागात माशांची संख्या आधीच 72 टक्क्यांनी खाली आली आहे, याला कारण वन्य मासेमारी आहे.मासेमारीवर अडीच लाख लोक जगतातपाकिस्तानी मच्छिमारांना भीती वाटते आहे की, चिनी जहाजांमुळे मासेमारी करणे आणखी कठीण होईल.  पाकिस्तानच्या किनारपट्टी भागात मासेमारी करून अडीच लाख लोक आपले आयुष्य जगतात. हे मच्छीमार लहान बोटी वापरतात आणि खोल समुद्रात जाऊ शकत नाहीत. चिनी जहाजे हे करू शकतात आणि त्यांच्याकडे प्रचंड जाळी आहे, ज्याद्वारे ते मोठ्या प्रमाणात मासे पकडू शकतात. इक्वाडोर असो वा ऑस्ट्रेलियन किनारा असो, चीनची जहाजे सर्वत्र मासेमारी करण्यात सक्षम आहेत. जगातील एक तृतीयांश मांसाहार हा चीनमध्ये केला जाते. त्यामुळे चिनी किनारपट्टीवर मासे जवळजवळ नष्ट झाले आहेत आणि आता चिनी जहाजांना जगाच्या इतर भागात मासे पकडण्याची इच्छा आहे. याचा शोध घेताना आता चिनी जहाजे अरबी समुद्रापर्यंत पोहोचली आहेत.

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तान