शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

चिनी दांपत्यांना तीन अपत्यांची आता परवानगी, सरकारचा निर्णय; लोकसंख्या नियंत्रणाच्या धोरण शिथिलता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 06:10 IST

Chinese couple now allowed three children : चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय मे महिन्यात घेतला होता. त्याला नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली.

बीजिंग : लोकसंख्या नियंत्रणाचे अतिशय कडक धोरण राबविणाऱ्या चीन सरकारने त्यातून जनतेला काही सूट दिली आहे. आता चिनी दांपत्याला तीन अपत्यांना जन्म देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यापूर्वी दोन अपत्येच जन्माला घालावीत, असे बंधन चिनी नागरिकांवर लादण्यात आले होते. 

चीनमधील सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने हा निर्णय मे महिन्यात घेतला होता. त्याला नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने शुक्रवारी मंजुरी दिली. चीन हा जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असला, तरी तिथे जन्मदराच्या प्रमाणात घट होत आहे. त्यामुळे भविष्यात चीनचे लोकसंख्या संतुलन बिघडू शकते. हा धोका लक्षात आल्यानेच दांपत्यांना दोनऐवजी आता तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.  वाढत्या महागाईमुळे व कायद्याच्या बंधनांमुळे चिनी दांपत्य कमी मुले जन्माला घालतात. एकापेक्षा अधिक मुले असतील, तर त्यांच्या संगोपनाचा खर्च खिशाला परवडत नाही, असे बहुसंख्य दांपत्यांचे मत आहे. ‘चायना डेली’ या चीन सरकारच्या मुखपत्राने म्हटले आहे की, लहान मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण यावरील खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी चीन सरकारने काही उपाय योजले आहेत. (वृत्तसंस्था)

खर्च कमी करण्यासाठी दिल्या भरघोस सवलतीमुलांचे संगोपन व शिक्षणावरील खर्च कमी करण्यासाटी सरकारने विशेष उपाययोजना केली आहे. तीन अपत्ये असलेल्यांना कर, विमा, शिक्षण, निवासस्थान, रोजगार, आर्थिक उत्पन्न यात भरघोस सवलती दिल्या आहेत. 

एक अपत्य धोरणाने नुकसान झाल्याचा दावाचीनमध्ये लोकसंख्या आणखी प्रचंड प्रमाणात वाढू नये, यासाठी एकच मूल जन्माला घालावे, अशी सक्ती दांपत्यांवर याआधी करण्यात आली होती. १९७९ ते २०१५ या काळात राबविण्यात आलेल्या या धोरणामुळे चीनचे खूप नुकसान झाले. या धोरणामुळे ४० कोटी अपत्यांचा जन्म होऊ शकला नाही, असा दावा आता चीन सरकारनेच केला आहे.

टॅग्स :chinaचीन