शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

China Coronavirus: कोरोनामुळे तब्बल 24 हजार मृत्यू; चीनी कंपनीचा डेटा लीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 18:30 IST

चीनमधील दुसऱ्या मोठ्या कंपनीकडून कोरोनातील मृतांचा आकडा लीक

बीजिंग: चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे झालेल्या मृतांचा आकडा हजारोंमध्ये असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. चीनमधली दुसऱ्या क्रमांकाची कंपनी असलेल्या टेनसेंटनं कोरोना विषाणूमुळे २४ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी दिली. मात्र काही वेळातच टेनसेंटनं ही आकडेवारी संकेतस्थळावरुन हटवली. तर कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत ५६३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती चीन सरकारनं दिली. कोरोना विषाणूमुळे २४ हजार ५८९ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी टेनसेंटनं संकेतस्थळावर प्रसिद्ध केली. तत्पूर्वी चीन सरकारनं मृतांचा आकडा ५६३ असल्याची अधिकृत आकडेवारी दिली असल्यानं टेनसेंटनं दिलेली माहिती पाहून अनेकांना धक्का बसला. यानंतर टेनसेंटच्या संकेतस्थळाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र थोड्याच वेळात टेनसेंटनं आकडेवारीत बदल केला. सरकार कोरोनाशी संबंधित माहिती लपवत असल्याचा आरोप यानंतर कम्युनिस्ट पक्षानं केला.तैवान न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार अनेक देशांमध्ये आपलं जाळं विस्तारलेल्या टेनसेंटकडून चुकून कोरोना विषाणूबद्दलची माहिती लीक झाली. चीनमधल्या तब्बल १ लाख ५४ हजार २३ जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असून मृतांचा आकडा २४ हजार ५८९ असल्याची आकडेवारी टेनसेंटनं दिली. काही वेळातच ही आकडेवारी टेनसेंटनं संकेतस्थळावरुन हटवली. कोरोनाची बाधा १४ हजार ४४६ जणांना झाली असून ३०४ जणांचे प्राण गेल्याची नवी आकडेवारी यानंतर टेनसेंटनं दिली. 

सोशल मीडियावर याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. कोडिंगमध्ये गोंधळ झाल्यानं चुकीचा आकडा प्रसिद्ध झाला असावा, असा अंदाज काहींनी व्यक्त केला. तर काहींनी टेनसेंटकडून चुकून खरी आकडेवारी लीक झाल्याचा दावा केला. जगभरातील लोकांना कोरोना विषाणूमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांचा खरा आकडा समजावा, यासाठी टेनसेंटच्या एखाद्या कर्मचाऱ्यानं मुद्दामहून हा आकडा प्रसिद्ध केला असावा, असादेखील तर्क काहींनी बांधला.  

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीन