शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
2
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
3
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
4
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
5
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
6
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
7
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
8
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
9
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
10
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
11
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
12
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
13
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
14
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
15
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
16
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
17
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
18
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
19
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
20
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल

पार बर्बाद केलं...! ...म्हणून जिगरी मित्र पाकिस्तानवर चीन भडकला? म्हणाला... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 14:13 IST

यासंदर्भात बोलताना सीनेटच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले सलीम मांडवीवाला म्हणाले, चीन सीपीईसी कामाच्या गतीवर समाधानी नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्यांनी पोर्टफोलिओमध्ये कुठलीही प्रगती बघितलेली नाही.

चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर (सीपीईसी) हा चीनच्या अब्जावधी डॉलर्सच्या महत्त्वाकांक्षी बेल्ट अँड रोड योजनेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. तथापि, पाकिस्तानमधीलसीपीईसी योजनेच्या संथ गतीमुळे चिनी कंपन्या नाराज आहेत. गेल्या तीन वर्षांत या प्रकल्पावर झालेल्या शून्य प्रगतीमुळे पाकिस्तानच्या सिनेट पॅनेलनेही चिंता व्यक्त केली आहे. (Chinese companies are frustrated with cpec project as no work is done by pak authorities in past three years)

यासंदर्भात बोलताना सीनेटच्या स्थायी समितीचे अध्यक्ष असलेले सलीम मांडवीवाला म्हणाले, चीन सीपीईसी कामाच्या गतीवर समाधानी नाही आणि गेल्या तीन वर्षांत त्यांनी पोर्टफोलिओमध्ये कुठलीही प्रगती बघितलेली नाही. यामुळे चिनी लोक नाराज असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर चिनी राजदूताने आपल्याकडे तक्रार केली, की आपण सीपीईसीला बर्बाद केले आहे आणि गेल्या तीन वर्षांत कोणतेही काम झालेले नाही.

कट्टरता जगासाठी सर्वात मोठं आव्हान; अफगाणिस्तान जिवंत उदाहरण; SCO समिटमध्ये PM मोदींचा प्रहार

सीपीईसी अथॉरिटीचे प्रमुख असीम सलीम बाजवा यांनी 60 अब्ज डॉलर्सचा हा सीपीईसी प्रकल्प पाकिस्तानसाठी लाइफलाइन असल्याचे म्हटले होते. एवढेच नाही तर, हा प्रकल्प पाकिस्तानला प्रगत आणि विकसित देशांच्या यादीत बसवेल, असेही ते म्हणाले होते. मात्र, आता बाजवा यांना बाजूला करून खालिद मन्सूर यांना सीपीईसी अथॉरिटीचे प्रमुख करण्यात आले आहे.

त्यांनी सीपीईसीच्या फेज 1 पावर प्रोजेक्ट्ससंदर्भातील कमिटीला माहिती दिली आहे. यात गुंतवणुकदारांसमोर येणाऱ्या आव्हानांसंदर्भातही भाष्य करण्यात आले आहे. यात स्वतंत्र वीज प्रकल्पाचा मुद्दा, दीर्घ काळापासून थकलेले कर्ज, ऑटोमॅटिक पेमेंट्ससाठी खाते तयार करणे, अशा अनेक मुद्द्यांचा समावेश आहे. मंसूर यांना ऊर्जा आणि पेट्रोकेमिकल क्षेत्राशी संबंधित मेगा प्रकल्पांचा 32 वर्षांचा अनुभव आहे.

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तानCPECसीपीईसी