शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

चिनी अंतराळवीरांनी तियांगोंग अंतराळ स्थानकात रुजवली रोपं, अवघं जग अवाक् 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 14:33 IST

Tiangong China Space Station: मागच्या काही वर्षांमध्ये चीनने अंतराळ संशोधनात बरीच मोठी मजल मारली आहे. दरम्यान, चिनी अंतराळवीरांनी आता अंतराळात पृथ्वीच्या कक्षेमध्ये रोपं रुजवून आणखी मोठी कमाल केली आहे.

मागच्या काही वर्षांमध्ये चीनने अंतराळ संशोधनात बरीच मोठी मजल मारली आहे. दरम्यान, चिनी अंतराळवीरांनी आता अंतराळात पृथ्वीच्या कक्षेमध्ये रोपं रुजवून आणखी मोठी कमाल केली आहे. चीनच्या राष्ट्रीय अंतराळ संस्थेने याबाबतचा एक व्हिडीओसुद्धा प्रसिद्ध केला आहे. या व्हिडीओमध्ये तियांगोंग अंतराळ स्थानकामध्ये उपस्थित असलेले चिनी अंतराळवीर विविध प्रयोग करताना दिसत आहेत. चीनने २५ एप्रिल रोजी तीन सदस्यीय शेंझोवू १८ यान अंतराळात पाठवलं होतं. तेव्हापासून कमांडर ये गुआंगफू, ली कांग आणि ली गुआंगसू हे अंतराळवीर तिथे आहेत. 

दरम्यान, चीनकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या नव्या व्हिडीओमध्ये हे अंतराळवीर निरीक्षणापासून देखभाल दुरुस्तीपर्यंतची काम पार पाडताना दिसत आहेत. या अंतराळवीरांनी अंतराळ स्टेशनवर एके ठिकाणी काही झाडंही रुजवली आहेत. ती एका ठिकाणी ठेवण्यात आली आहेत. दरम्यान, अंतराळात असलेले हे चिनी अंतराळवीर नोव्हेंबर महिन्यापर्यंत तिथे राहणार आहेत. पृथ्वीवर परतण्यापूर्वी ते अंतराळ स्थानकाचं नियंत्रण शेंन्झोवू १९ च्या अंतराळवीरांकडे सोपवतील. 

चीनचं तियांगोंग हे अंतराळ स्थानक हे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापेक्षा मोठं आहे. या अंतराळ स्थानकामध्ये किमान १० वर्षे तरी नियमितपणे अंतराळवीरांना कायम वास्तव्यास ठेवण्याचा चीनचा इरादा आहे. चीनने या अंतराळ स्थानकाच्या बांधणीला २०२१ मध्ये सुरुवात केली होती. तर वर्षभरानंतर २०२२ मध्ये त्याची बांधणी पूर्ण झाली होती.  येथे दर सहा महिन्यांनी नव्या अंतराळवीरांना पाठवलं जातं. तियांगोंग अंतराळ स्थानक पृथ्वीपासून ३४० ते ४५० किमी उंचीवरून पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असते.  

टॅग्स :chinaचीनscienceविज्ञानInternationalआंतरराष्ट्रीय