कोरोना वायरसची लागण झालेल्या एका ब्रिटिश नागरिकाने त्याने व्हिस्की आणि मध प्यायल्याने कोरोना वायरसपासून स्वतः चा जीव वाचवला असल्याचा अनोखा दावा केला आहे. या ब्रिटिश नगराचे नाव कोनोर रीड (२५) असं आहे.
China Coronavirus: कोरोना व्हायरसवर कॉकटेल लस; 48 तासांत सुधारणा होत असल्याचा दावा
China Coronavirus : चीनमधील मृतांची संख्या ३६१; आतापर्यंत १७,२०५ लोकांना संसर्ग
जुन्या पद्धतीचा उपाय केला, मात्र ती युक्ती केल्यासारखे वाटले, असे कोनोरने युकेतील एका वृत्तपत्राला सांगितले. यासाठी मी पुरावा आहे कोरोना वायरसने माझा मृत्यू झाला असता. कोनोर हा गेल्या उन्हाळ्यात इंग्रजी शिकवण्यासाठी वुहानमध्ये गेला होता. खूप खोकला आणि श्वसनाच्या त्रासामुळे कोनोरला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर २ आठवड्यांनी डिस्चार्ज देण्यात आला. नंतर त्याला कोरोना वायरसचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती न्यू यॉर्क पोस्टने दिली आहे.