शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रावरील अपरिचित ठिकाणी उतरले चीनचे यान; पहिले छायाचित्रही पाठवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2019 04:24 IST

चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे.

बीजिंग : चीनचे चांग ई ४ हे यान चंद्राच्या दूरच्या व अपरिचित बाजूला उतरण्यात यशस्वी झाले आहे. चंद्राच्या अपरिचित बाजूला पोहोचणारे जगातील हे पहिले यान ठरले आहे.या यशस्वी प्रक्षेपणामुळे जागतिक स्तरावर अंतराळातील महाशक्ती होण्याच्या चीनच्या महत्त्वाकांक्षांना आणखी बळ मिळाले आहे. चीनच्या राष्ट्रीय अंतराळ प्रशासनाने (सीएनएसए) घोषणा केली आहे की, यान ‘चांग ई४’ने चंद्राच्या अपरिचित बाजूची छायाचित्रे पाठविली आहेत. निर्धारित लँडिंगस्थळी हे यान गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी १० वाजून २६ मिनिटांनी पोहोचले. ‘चांग ई४’चे प्रक्षेपण शिचांगच्या प्रक्षेपण केंद्रावरून ८ डिसेंबर रोजी लाँग मार्च ३ बी रॉकेटच्या माध्यमातून केले होते. या यानाने मॉनिटर कॅमेऱ्यातून घेतलेले लँडिंग स्थळाचे एक छायाचित्र पाठविले. चंद्राच्या अपरिचित बाजूने घेतलेले हे जगातील पहिले छायाचित्र आहे. हे छायाचित्र सीएनएसएने प्रकाशित केले आहे. (वृत्तसंस्था)रहस्यमय भागाचा शोधसरकारी न्यूज एजन्सी शिन्हुआने सांगितले की, ‘चांग ई ४’ मिशन चंद्राच्या रहस्यमयी भागाचा शोध घेण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडेल. चंद्र अभियान ‘चांग ई ४’चे नाव चिनी पौराणिक कथांच्या चंद्रमा देवीच्या नावावर ठेवण्यात आले आहे. ‘चांग ई ४’हे यान दोन मुख्य भागात बनले आहे. मुख्य लँडरचे वजन २४०० पाऊंड आहे आणि रोव्हर ३०० पाऊंडचे आहे. तुलनेत नासाच्या मंगळावरील रोव्हरचे वजन ४०० पाऊंड आहे.

टॅग्स :chinaचीन