शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाममध्ये लष्करी जाळं उभारण्याचं चीननं केलं समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 17:16 IST

भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच चीननं भारताच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर स्वतःच्या हद्दीत बांधकाम केलं आहे.

बीजिंग- भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या मुद्द्यावरून वाद सुरू असतानाच चीननं भारताच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर स्वतःच्या हद्दीत बांधकाम केलं आहे. विशेष म्हणजे बांधकामाचं चीनकडून समर्थनही करण्यात आलं आहे. चीनकडून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या निर्माणाला चीननं वैध ठरवलं आहे.सैनिकांचं जीवनस्तर उंचावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचं चीनकडून सांगण्यात आलं आहे. चीननं डोकलामच्या भूभागात केलेल्या नव्या निर्माणावर प्रश्न विचारण्यात आल्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लू कांग यांनीही बांधकामाच्या वृत्ताचं समर्थन केलं. ते म्हणाले, मीसुद्धा यासंदर्भात बातमी वाचली आहे. मला माहीत नाही ही छायाचित्रं कुठून आली. माझ्याकडे याची सविस्तर माहिती नाही. परंतु डोकलाम मुद्द्यावर चीनची भूमिका स्पष्ट आहे. डोकलाम हा नेहमीच चीनचा एक भाग राहिला आहे आणि तो चीनच्या अधिकार क्षेत्रातच येतो. चीन आता सैनिकांच्या सुविधेसाठी बांधकाम करत आहे. त्यामुळे सीमावर्ती भागात राहणारे सैनिक आणि जनतेला याचा फायदा होणार आहे, असंही लू कांग म्हणाले आहेत. 

चीन डोकलाममध्ये एक मोठा मिलिटरी कॉम्प्लेक्स बनवत आहे. सेटलाइटच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांवरून याचा खुलासा झाला आहे. भूतान डोकलाममधील ज्या भागावर आपला दावा सांगत आहे तिथेच चीनने लष्करी साम्राज्य उभे केले आहे. डोकलाम पठाराच्या भागात चीनने विस्तीर्ण असे रस्त्यांचे जाळे निर्माण केले आहे. हेलिपॅड उभारले आहेत. वादग्रस्त भागात पूर्व आणि पश्चिमेला अनेक लष्करी तळ उभे केले आहेत. या सॅटलाईट फोटोंमध्ये चीनचा शस्त्रसाठा, तोफा कुठेही दिसलेल्या नाहीत. पण काही भागांमध्ये खोदकाम करण्यात आले असून तिथे तोफा आणल्या जाऊ शकतात. चीन या भागात आपली घातक शस्त्रास्त्रे तैनात करु शकतो याचीच भारताला सुरुवातीपासून चिंता आहे. सिक्कीमच्या डोकलामक भागात भारताची पोस्ट आहे. चीनच्या लष्करी तळापासून फक्त 81 मीटर अंतरावर ही पोस्ट आहे. युद्धाच्या प्रसंगात भारताची ही पोस्ट सहज चीनच्या टप्प्यात येईल. 

या कारणास्तव संघर्षाला मिळाली ठिणगी16 जूनपासून डोकलाममध्ये भारत आणि चीन संघर्षाला सुरुवात झाली होती. 73 दिवस दोन्ही देशांचे सैन्य समोरासमोर होते. भारत, चीन आणि भूतान या तीन देशांच्या सीमा डोकलाममध्ये जिथे मिळतात त्या भागाला ट्राय जंक्शन म्हणतात. चीनने त्या ट्राय जंक्शनजवळ रस्ता बांधणीचे काम सुरु केल्यामुळे संघर्षाला सुरुवात झाली होती. कारण चीनने जर इथे रस्ता बांधला असता तर भारताचा रणनितीक दृष्टया महत्वाचा भूप्रदेश चीनच्या टप्प्यात आला असता.  

टॅग्स :chinaचीनDoklamडोकलाम