शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

चीनचा पाकिस्तानला दे धक्का! भ्रष्टाचारामुळे महत्वकांक्षी CPEC रस्ते प्रकल्पांचा रोखला पैसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 17:46 IST

चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोअरतंर्गत (CPEC) या तीनही रस्ते प्रकल्पांसाठी चीनकडून फंडिग करण्यात येत होते.

ठळक मुद्देचीनकडून नवीन मार्गदर्शकतत्व जारी झाल्यानंतर पुन्हा फंडिग सुरु होईल असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले.चीनने वन बेल्ट वन रोड ही महत्वकांक्षी योजना आखली असून 60 अब्ज डॉलर्सचा सीपीईसी प्रकल्प या योजनेतील महत्वाचा टप्पा आहे.

बिजींग - पाकिस्तानातील तीन महत्वांच्या रस्ते प्रकल्पांचा निधी रोखण्याचा निर्णय चीनने घेतला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरतंर्गत (CPEC) या तीनही रस्ते प्रकल्पांसाठी चीनकडून फंडिग करण्यात येत होते. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनने तात्पुरता निधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या कृतीने पाकिस्तानला जबर धक्का बसल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले आहे. 

चीनकडून नवीन मार्गदर्शकतत्व जारी झाल्यानंतर पुन्हा फंडिग सुरु होईल असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले. चीनने वन बेल्ट वन रोड ही महत्वाकांक्षी योजना आखली असून 60 अब्ज डॉलर्सचा सीपीईसी प्रकल्प या योजनेतील महत्वाचा टप्पा आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्प बलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे. चीनच्या निर्णयाचा डेरा इस्माइल खान ते हॉब रोड, हुझदार ते बासीमा रोड आणि रायकोट ते थाकोट या तीन प्रकल्पाच्या कामावर परिणाम होणार आहे. 

सीपीईसी प्रकल्पाच्या कामात अनेक अडथळे आले आहेत.  ऑक्टोंबर महिन्यात पाकिस्तानच्या ग्वादर बंदरातील कामगारांच्या वसतिगृहावर अज्ञात आरोपींनी ग्रेनेड हल्ला केला होता. या ग्रेनेडच्या स्फोटात 26 कामगार जखमी झाले होते. हे बंदर सीपीईसी प्रकल्पाचा भाग आहे. 

ग्वादर बंदर पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतामध्ये आहे. या भागात विपुल साधन संपत्ती आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीपीईसी प्रकल्पाला बलुचिस्तानमध्ये मोठा विरोध आहे. हे बंदर पश्चिम चीनला मध्यपूर्व आणि युरोपशी जोडणार आहे. या प्रकल्पासाठी काम करणा-या चिनी नागरीकांवर यापूर्वीही इथे हल्ले झाले आहेत. वसतिगृहात कामगार जेवायला बसलेले असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने ग्रेनेड फेकले अशी माहिती पोलीस अधिकारी इमाम बक्षी यांनी दिली. 

पाकिस्तान नैसर्गिक साधन संपत्तीचा गैरवापर करत असल्याने बलुचिस्तानातल्या अनेक गटांचा सीपीईसी प्रकल्पाला विरोध आहे. बलुचिस्तानमध्ये अनेक दहशतवादी सुद्धा सक्रीय आहेत. दहशतवादी हल्ले करुन इथे सुरु असलेल्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. 2014 पासून आतापर्यंत बलुचिस्तानात 50 पाकिस्तानी कामगारांची हत्या झाली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानchinaचीनCPECसीपीईसी