शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

विवाद सुरू असतानाही चीनचा नवा सीमा कायदा, तणावात भर पडण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 08:07 IST

चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनपीसी) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल.

बीजिंग : भारताशी सीमातंट्यावरून तणाव निर्माण झालेला असूनही चीनने पुन्हा एक आगळीक केली आहे. चीनने स्वत:च्या सीमांचे रक्षण करण्यासाठी एक नवीन कायदा संमत केला आहे. त्यामुळे सीमावादात भर पडण्याचीच शक्यता आहे.चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या (एनपीसी) स्थायी समितीने सीमाविषयक नव्या कायद्याला शनिवारी मंजुरी दिली आहे. त्या कायद्याची अंमलबजावणी येत्या १ जानेवारीपासून करण्यात येईल. चीनचे सार्वभौमत्व व सीमा सुरक्षित राखणे याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आमच्यावर कोणीही आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी हा नवा कायदा करण्यात आला आहे, असे चीनने म्हटले आहे.चीनने पूर्व लडाखमध्ये घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारताने उधळून लावला होता. चीनने शनिवारी मंजूर केलेल्या नव्या कायद्यात म्हटले आहे की, सीमा अधिक बळकट करण्यासाठी चीन सर्व प्रकारची उपाययोजना करणार आहे. सीमाभागातील लोकांचा सामाजिक व आर्थिक विकास करण्यास प्राधान्य देण्यात येईल. तसेच सीमाभागात पायाभूत सुविधांची मोठ्या प्रमाणावर उभारणी केली जात आहे. शेजारी राष्ट्रांशी सलोख्याचे संबंध राखण्याचे चीनचे धोरण आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले सीमावाद चर्चेच्या माध्यमातून सोडविण्यावर आम्ही भर देणार आहोत, असे चीनने म्हटले आहे. (वृत्तसंस्था)

चीनचा १२ देशांशी सीमातंटाभारत व भूतान या दोन देशांशी सीमानिश्चितीबाबत चीनने अद्याप करार केलेला नाही. भूतानशी सीमातंट्याबाबत तीन टप्प्यांत चर्चा करून तोडगा काढण्याच्या संदर्भात चीनने नुकताच त्या देशाशी करार केला आहे. चीनची भूमिका कायम विस्तारवादी राहिली आहे. त्यामुळे त्याचे १२ देशांशी सीमातंटे सुरू आहेत. त्यामध्ये रशिया, मंगोलिया, अफगाणिस्तान, ताजिकिस्तान, कझाकस्तान, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया, नेपाळ, भारत, भूतान, आदी देशांचा समावेश आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत