शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नेपाळला अमेरिकेची 'पॉवर', चीनला ४४० व्होल्टचा 'शॉक'; दोघांच्या भांडणात भारताचा लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2023 12:46 IST

नेपाळमध्ये एमसीसी सुरू झाल्यानंतर, भारताला मोठा फायदा होणार आहे...

काठमांडू -नेपाळमध्येचीनच्या चालिला पार सुरुंग लागला आहे, ड्रॅगनची चाल फेल झाली आहे. आता नेपाळ 30 ऑगस्‍टपासून अमेरिकेच्या मिलेनियम चॅलेन्ज कोऑपरेशन अथवा एमसीसी प्रोग्रॅमला पूर्णपणे लागू करणार आहे. कोट्यवधी डॉलरचा हा अमेरिकन प्रोग्रॅम सुरू होताच नेपाळमध्ये विजेसाठी ट्रान्समिशन लाइन आणि हायवेचे निर्माण कार्याला सुरवात होईल. हा प्रोजेक्ट पुढील 5 वर्षांच्या आत पूर्ण करावा लागणार आहे. नेपाळ आणि अमेरिकेने 2017 मध्ये एमसीसी प्रॉजेक्‍टवर स्वाक्षरी केली होती. मात्र चीनच्या विरोधामुळे हा प्रॉजेक्‍ट सुरू होऊ शकत नव्हता.

साधारणपणे दीड वर्षापूर्वीच नेपाळच्या संसदेने अमेरिकन एमसीसीला मान्यता दिली होती. अमेरिका एमसीसी प्रकल्पांतर्गत नेपाळला तब्बल 700 दशलक्ष डॉलरची मदत करत आहे. MCC प्रकल्पांतर्गत नेपाळमधील बुटवलपासून ते भारतातील गोरखपूरपर्यंत ट्रान्समिशन लाइन तयार करण्यात येणार आहे. मात्र, या संपूर्ण प्रकल्पासाठी अद्याप जमीन संपादन झालेले नाही. नेपाळमध्ये एमसीसी प्रकल्पाची सुरुवात होणे हा चीनसाठी मोठा धक्का आहे, चीन आपल्या कम्युनिस्ट 'गुलामां'च्या सहाय्याने गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात निदर्शने करत होता.

नेपाळच्या निर्णयाने चीनला धक्का - या प्रकल्पाला नेपाळ संसदेने मंजुरी दिल्याने, चीनला जबरदस्त धक्का बसला होता. यानंतर, संताप व्यक्त करत, अमेरिकेने मुत्सद्देगिरीद्वारे इतर देशांचे सार्वभौमत्व कमी करू नये, असे चीनने म्हटले होते. तत्पूर्वी, एमसीसी मंजूर न झाल्यास याचे परिणाम भोगावे लागतील, असे अमेरिकेने नेपाळला स्पष्टपणे सांगितले होते. याच बरोबर एमसीसी हा अमेरिकेच्या इंडो-पॅसिफिक धोरणाचा भाग असल्याचा दावाही चीनने केला होता, मात्र नेपाळने हे पूर्णपणे फेटाळून लावले. तसेच, ही केवळ आर्थिक मदत आहे, नेपाळचे संविधान सर्वोच्च आहे, असेही नेपाळणे म्हटले आहे.

भारताला होणार मोठा फायदा - नेपाळमध्ये एमसीसी सुरू झाल्यानंतर, भारताला मोठा फायदा होणार आहे. यामुळे भारतीय कंपन्यांना मोठा कॉन्ट्रॅक्ट मिळणार आहे. अमेरिकेसोबतच्या भागिदारीमुळे भारताचा नेपाळ मधील प्रभाव वाढेल. सध्या नेपाळमध्ये चीन मोठ्या प्रमाणावर सक्रीय आहे. यामुळे भारत आणि अमेरिकेला नेपाळमध्ये चीनला संतुलित करता येईल. या प्रॉजेक्‍टच्या माध्यमाने ईस्‍ट-वेस्‍ट हायवे तयार होत आहे. यामुळे नेपाळचा भारता बरोबरचा संपर्क वाढेल. 

 

टॅग्स :NepalनेपाळchinaचीनAmericaअमेरिकाIndiaभारत