शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

CPEC प्रकल्पात पाकिस्तानी लष्कराला सक्रिय करण्याचा चीनचा इरादा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2017 20:17 IST

सीपीईसी प्रकल्पासाठी चीनकडून देण्यात येणा-या निधीमध्ये पाकिस्तानात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे.

ठळक मुद्देचीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात चीनने मोठया प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानात लष्कर हे सत्तेचे सर्वात महत्वाचे केंद्र आहे, त्यामुळे आता थेट लष्करालाच सक्रीय करण्याची चीनची इच्छा आहे. 

बिजींग -  सीपीईसी प्रकल्पासाठी चीनकडून देण्यात येणा-या निधीमध्ये पाकिस्तानात मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु आहे. त्यामुळे चीनने सध्या या प्रकल्पातंर्गत बांधण्यात येणा-या तीन महत्वाच्या रस्त्यांसाठीचा निधी रोखला आहे. हा भ्रष्टाचार कमी व्हावा यासाठी पाकिस्तानी लष्कराने सीपीईसी (CPEC) प्रकल्पात सक्रिय होऊन महत्वाची भूमिका बजावावी अशी चीनची इच्छा आहे. 

दक्षिण आशियावर अभ्यास करणा-या युरोपियन फाऊंडेशनच्या थिंक टँकने आपल्या अहवालात सीपीईसी प्रकल्पाबद्दल हे म्हटले आहे. चीन आणि पाकिस्तानला जोडणा-या सीपीईसी प्रकल्पात चीनने मोठया प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोरतंर्गत (CPEC) रस्त्यांसह विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची उभारणी सुरु आहे. यासाठी चीनकडून पाकिस्तानला मोठया प्रमाणात अर्थसहाय्य केले जात आहे. पाकिस्तानात लष्कर हे सत्तेचे सर्वात महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे आता थेट लष्करालाच सक्रीय करण्याची चीनची इच्छा आहे. 

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे चीनने तात्पुरता निधी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या या कृतीने पाकिस्तानला जबर धक्का बसल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांनी दिले होते. चीनकडून नवीन मार्गदर्शकतत्व जारी झाल्यानंतर पुन्हा फंडिग सुरु होईल असे वरिष्ठ सरकारी अधिका-यांनी सांगितले.

चीनने वन बेल्ट वन रोड ही महत्वाकांक्षी योजना आखली असून 60 अब्ज डॉलर्सचा सीपीईसी प्रकल्प या योजनेतील महत्वाचा टप्पा आहे. पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधून जाणारा हा प्रकल्प बलुचिस्तान आणि चीनच्या शिनजियांग प्रांताला जोडणार आहे. चीनच्या निर्णयाचा डेरा इस्माइल खान ते हॉब रोड, हुझदार ते बासीमा रोड आणि रायकोट ते थाकोट या तीन प्रकल्पाच्या कामावर परिणाम होणार आहे.