शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

डोकलाम वादात रशियाच्या भूमिकेमुळे चीनच्या पदरात पडली निराशा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2017 15:26 IST

सध्याच्या जागतिक राजकारणातील परिस्थितीमुळे चीन आणि रशिया परस्परांच्या जवळ आले आहेत. दोघांमधील संबंधही दृढ होत चालले आहेत.

ठळक मुद्देचीनने भारताविरोधात रशियाचे कान भरण्याचा प्रयत्न केला

मॉस्को, दि. 2 - सध्याच्या जागतिक राजकारणातील परिस्थितीमुळे चीन आणि रशिया परस्परांच्या जवळ आले आहेत. दोघांमधील संबंधही दृढ होत चालले आहेत. पण असे असले तरी,  डोकलामच्या मुद्यावर रशियाने चीनला अजिबात साथ दिली नाही. चीनने भारताविरोधात रशियाचे कान भरण्याचा प्रयत्न केला पण रशियाने चीनला पूरक ठरेल अशी कोणतीही भूमिका घेतली नाही. भारत-रशिया यांचे पूर्वापार असलेले संबंध आणि ब्रिक्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका यामुळे डोकलाम वादात रशियाने पूर्णपणे तटस्थतेची भूमिका घेतली. 

डोकलाममधून भारत आणि चीन दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेण्याची भूमिका जाहीर करण्याच्या काही तास आधी बिजींगमधील रशियन राजदूत अँड्रे डेनीसोव्ह यांनी रशियाची भूमिका स्पष्ट केली. दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या डोकलाम तिढयावर अखेर 28 ऑगस्टला तोडगा निघाला. दोन्ही देशांनी आपले सैन्य मागे घेतले. 

भारत-चीन सीमेवर जी परिस्थिती आहे त्याबद्दल चिंता वाटते. भारत आणि चीन आमचे दोन्ही मित्र देश या वादावर तोडगा काढतील. त्यांना कुठल्या मध्यस्थाची आवश्यकता आहे असे आम्हाला वाटत नाही असे डेनीसोव्ह यांनी रशियन पत्रकारांना सांगितले. चीनने कुटनितीक स्तरावर रशियाला सोबतीला घेऊन भारताविरोधात आघाडी उभारण्याचा प्रयत्न केला. पण रशियाच्या भूमिकेमुळे चीनला त्यात यश मिळाले नाही. चीन आणि रशिया हे दोन्ही देश अमेरिकेच्या विरोधात आहेत. त्यामुळे सध्याच्या घडीला जागतिक राजकारणात या दोन देशांची जवळीक वाढली आहे. 

कृपा करुन पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा ब्रिक्समध्ये उपस्थित करु नकापंतप्रधान नरेंद्र मोदी चीनमध्ये पार पडणा-या ब्रिक्स परिषदेला हजेरी लावणार असून यावेळी पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा उपस्थित करु नका असा अप्रत्यक्ष संदेशच चीनने मोदींना दिला आहे. पाकिस्तानशी संबधित दहशतवादाचा मुद्दा चर्चेला आल्यास आपला आक्षेप असेल असं चीनने सांगितलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी गोवामध्ये पार पडलेल्या ब्रिक्स परिषदेत बोलताना पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांचा अड्डा असल्याचं बोलले होते. यामुळे चीनला पुन्हा एकदा मोदी हा उल्लेख करतील अशी चिंता आहे. 

'पाकिस्तानशी संबंधित दहशतवादाचा मुद्दा आला की, भारत नेहमीच आपली चिंता व्यक्त करताना दिसतो. ब्रिक्स परिषदेत चर्चा करण्यासाठी हा योग्य विषय आहे असं मला वाटत नाही', असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग बोलल्या आहेत. हा विषय चर्चेला आला तर चीनी नेते आपला मित्रराष्ट्र पाकिस्तानची बाजू घेतील, ज्याचा परिणाम ब्रिक्स परिषदेवर होईल असंही हुआ चुनयिंग यांनी सांगितलं आहे. 

टॅग्स :chinaचीन