शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाची साथ असताना चीनचे दक्षिण चीन सागरात शीतयुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 05:38 IST

अलीकडेच व्हिएतनामची मासेमारी बोट बुडवली

नवी दिल्ली : कोरोना रोगाची साथ आटोक्यात आणण्यासाठी संपूर्ण जगाने लक्ष केंद्रित केलेले असताना चीन मात्र दक्षिण चीन सागरात शीतयुद्ध छेडत वर्चस्व गाजवीत आहे. अलीकडेच चीनने व्हिएतनामची एक मासेमारी बोट वादग्रस्त दक्षिण चीन सागरात धडक देऊन बुडविली, तसेच या बोटीवरून आठ जणांना ताब्यात घेत व्हिएतनामच्या अन्य दोन बोटी जप्त केल्या.

कोरोना साथीच्या फायदा घेत चीन या सागरी हद्दीत वर्चस्व राखण्यासाठी शीतयुद्ध छेडत आहे. अनेक देशांनी वेळीच लक्ष दिले नाही, तर चीनच्या कारवायांची व्याप्ती वाढत जाईल. तब्बल आठवड्यापासून चीन दक्षिण चीन सागरात मनमानी कारवाया करून या वादग्रस्त सागरीहद्दीत आपली उपस्थिती वाढवून धाक निर्माण करीत आहे. चीनशिवाय अन्य चार देशही दक्षिण चीन सागरावरील दावेदार आहेत.मार्चपासून हवाई कवायतीतैवान, व्हिएतनाम, फिलिपीन, मलेशिया आणि ब्रुनेईचाही या वादग्रस्त सागरावर दावा आहे. या चारही देशांत कोरोनाचे ११ हजार रुग्ण आढळले आहेत. या देशांनी संरक्षणात्मक व्यवहार थांबविले आहेत.कोरोनामुळे अन्य देशांत कहर उडाला असून, चीन मात्र उपरोक्त शेजारी देशांवर वर्चस्व गाजवीत आहे. जानेवारीपासून चीनच्या १३० बोटींनी फिलिपीनव्याप्त पगसा बेटापर्यंत मजल मारली होती. दक्षिण चीन सागरातील कृत्रिम बेटावर चीनने दोन नवीन संशोधन केंद्र उभारली आहेत. या माध्यमातून चीन नौकानयन करून स्प्राटलिस बेटात वैज्ञानिक संशोधन करीत आहेत.मार्चपासून चीनची लढाऊ विमान तैवानच्या किनारपट्टीगत हवाई कवायती करीत आहेत. नंतर तैनात केलेले एक विमान जपानच्या लष्कराने रोखले होते. आता चीनने व्हिएतनामची एक बोट बुडविली. त्यातून चीनचा डाव स्पष्ट होतो.

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याSea Routeसागरी महामार्ग