China Weather: लाखो वर्षांपू्र्वी पृथ्वीवर हिमयुगा होते, पण कालांतराने परिस्थिती सामान्य होत गेली. मात्र, चीनमध्ये रविवारी अचानक तापमानात 45 अंशांनी कमी झाले. पारा उणे 52 अंश सेल्सिअसवर पोहोचला. शेकडो पक्षी मृत्यूमुखी पडले, अख्खी नदी गोठली, सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरली. अचानक आलेली ही परिस्थिती पाहून हिमयुगाची आठवण अनेकांना आली.
चीनमध्ये रविवारी हवामानात दोनदा झपाट्याने बदल झाला. पहिले वाळूचे वादळ आले आणि दुसरे म्हणजे, पारा कमी होण्याबरोबर जोरदार बर्फवृष्टी सुरू झाली. चिनी पत्रकार जेनिफर झेंग यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात तापमानात झालेल्या बदलामुळे नदी गोठल्याचे आणि हजारो पाणपक्षी मरण पावल्याचे दिसत आहे.
64 वर्ष जुना विक्रम मोडलाचीनच्या शिनजियांगमध्ये गेल्या 64 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. रस्ते आणि महामार्गांवर भयानक बर्फ साचलाय. त्यामुळे प्रवास करणे कठीण झाले आहे. चीनमध्ये डीप फ्रीझसारखी स्थिती झाली आहे. परिसरात बर्फाची वादळे येत आहेत. ईशान्येकडील हेलोंगजियांग राज्यात गेल्या वर्षी 22 जानेवारीला तापमान उणे 53 वर पोहचले होते, तर आता शिनजियांगमध्ये उणे 52.3 अंशांवर पोहोचले आहे. यापूर्वी 21 जानेवारी 1960 रोजी शिनजियांगमधील तापमान इतके कमी होते.
पोलर व्हॉर्टेक्समुळे परिस्थिती बदलल्याचा अंदाजसध्या चीनमध्ये 853 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांवर बर्फ आहे. हा बर्फ दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांना प्रवास करण्यास मनाई करण्यात आली आहे. 43 रस्ते बंद करण्यात आले आहेत. चीनमध्ये, इनर मंगोलिया, ईशान्य चीन, हुबेईचा मध्य भाग आणि हुनान प्रांताच्या दक्षिणी भागाला हवामानाचा सर्वाधिक फटका बसला आहे. काही शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, यामागे पोलर व्होर्टेक्स हे मुख्य कारण आहे.