शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

भीषण! चीनमध्ये 'मुइफा' वादळाचे थैमान; मुसळधार पावसाचा कहर, 10 लाख लोकांना केलं रेस्क्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 19:13 IST

वादळाच्या तडाख्याने जिआंग्सूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून गुरुवारी प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या.

चीनमध्ये 'मुइफा' वादळाचे थैमान पाहायला मिळत असून मुसळधार पावसाने कहर केला आहे. 'मुइफा' चक्रीवादळ गुरुवारी चीनच्या पूर्व किनार्‍याकडे सरकलं आहे. वादळामुळे शांघाई शहरात जोरदार वारा आणि मुसळधार पाऊस पडला. चीनच्या राष्ट्रीय हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हे वादळ बुधवारी किनारपट्टीवर 125 किलोमीटर (77 मैल) प्रति तास वेगाने वाऱ्यासह आले. शांघाई परिसरात वादळामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही 

दक्षिण शांघाईमधील निंगबो शहरात पाणी साचल्याचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहे. या फोटोमध्ये मुसळधार पावसानंतर अनेक स्कूटर आणि कार पाण्यात बुडालेल्या दिसत आहेत. वादळाच्या तडाख्याने जिआंग्सूमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून गुरुवारी प्रांतातील सर्व जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या. राष्ट्रीय हवामान केंद्राने गुरुवारी सकाळी जास्तीत जास्त 108 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे, जे दिवस पुढे जात असताना हळूहळू कमकुवत होईल असं म्हटलं आहे. 

शांघाई परिसरात वादळामुळे मेट्रो सेवाही बंद करण्यात आली होती. मात्र आता पुन्हा सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे शांघाईच्या दक्षिणेकडील निंगबो शहरात पाणी साचले. अनेक फूट साचलेल्या पाण्यात स्कूटर आणि कार बुडाल्या. मात्र, अधिकृतपणे केवळ काही रस्ते बंद करण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :chinaचीन