शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
2
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
3
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
4
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
5
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
6
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
7
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
8
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
9
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
10
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
11
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
12
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
13
लातुरात लॉजवरच सुरू होता वेश्या व्यवसाय; पोलिसांची धाड, दोन महिलांची सुटका; सात जणांना अटक
14
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
15
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
16
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
17
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
18
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
19
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
20
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव

चीनचा फुगा; अमेरिकेची हवा! संघर्षाचे नजरेत आलेले दोन पैलू जास्त चिंताजनक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 09:01 IST

चीनने सोडलेला फुगा आणि त्याला अमेरिकेने दिलेले प्रत्युत्तर हे हिमनगाचे टोक आहे. परिणामी भविष्यात अशा प्रकारच्या संघर्षात वाढ होण्याची शक्यता असून, जागतिक स्थिरतेचा फुगा कधीही फुटू शकतो.

डॉ. रोहन चौधरी,  आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक  

अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी यांच्या गेल्या वर्षीच्या तैवान भेटीवरून अमेरिका-चीन यांच्यात ताणलेले संबंध सुधारण्याच्या हेतूने अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी चीनचा दौरा आयोजित केला होता. परंतु, नेमके त्याच वेळेस अमेरिकेच्या आकाशात दिसलेला चिनी फुगा आणि अमेरिकेने तो पाडण्याची केलेली कृती यावरून ब्लिंकेन यांचा दौरा रद्द तर झालाच, परंतु यानिमित्ताने जागतिक संघर्षाचे नजरेत आलेले दोन पैलू जास्त चिंताजनक आहेत.

पहिला पैलू हा अमेरिका आणि चीन या दोन बड्या राष्ट्रांतील अविश्वासाचा आहे.  फुग्याद्वारे चीन आपल्यावर हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून खास लढाऊ विमानाद्वारे अमेरिकेकडून तो फुगा पाडण्यात आला. दुसरीकडे वातावरणाविषयी संशोधनाच्या हेतूने तो फुगा सोडला असून, तो भरकटला असे स्पष्टीकरण चीनने दिले. बायडेन अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर चीन-अमेरिका यांच्यात संवाद सुरळीत होऊन त्याद्वारे विश्वासाचा सेतू निर्माण होईल अशी अपेक्षा होती. परंतु, कोणत्याही मार्गाचा वापर करून आपला प्रभाव अबाधित राखण्याचा प्रयत्न करणारी अमेरिका आणि कोणत्याही थराला जाऊन त्या प्रभावाला आव्हान देणारा चीन यामुळे जागतिक शांतता ही कमालीची संवेदनशील बनली आहे. त्यातही कोणतीही जागतिक संस्था अथवा कोणताही देश निर्णायक हस्तक्षेप करू शकत नसल्यामुळे छोट्याशा ठिणगीवरून संघर्षाचा भडका उडू शकतो.

दुसरा पैलू हा संघर्षाच्या बदलत्या स्वरूपाचा आहे. पारंपरिकदृष्ट्या युद्धे ही सीमेवर लढली जायची. त्यामुळे अशा युद्धाविषयी अंदाज बांधणे शक्य होते. परंतु, तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे आणि समाजमाध्यमांच्या प्रभावामुळे अवघे जग युद्धभूमी बनले आहे. चीनने सोडलेला फुगा हा या युद्धाचा भाग असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. जमीन, समुद्र याचबरोबर अवकाशाचे महत्त्व वाढले आहे. यापूर्वीही चंद्रावर उतरवल्या जाणाऱ्या रॉकेटच्या लँडिंग जागेवरून या दोन्ही देशांमध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. नासाने आपले रॉकेट स्थापन करण्यासाठी चंद्रावर ज्या जागेची निवड केली आहे तिथेच आपले रॉकेटदेखील उतरवण्याची चीनची योजना आहे. यासारख्या अंतराळ मोहिमांबाबत चर्चा करण्यासाठी चीन आणि अमेरिका यांच्यात ‘अमेरिका-चीन सिव्हिल स्पेस डायलॉग’ ही समिती स्थापन करण्यात आली आहे. परंतु, २०१७ नंतर या समितीची बैठक झालेली नाही. दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे उपग्रहाचे महत्त्वदेखील वाढले त्यावरूनही भविष्यात संघर्ष होण्याची शक्यता आहे. थोडक्यात, भारत-चीन यांचा सीमेवरून सुरू असलेला पारंपरिक संघर्ष, दहशतवादी संघटनांकडून सुरू असलेले अपारंपरिक युद्ध आणि चीन-अमेरिका यांच्यात अंतराळावरून असणारा संघर्ष असे संघर्षाचे प्रकार असून, कोणत्याही प्रकारचा संघर्ष जागतिक शांततेचा फुगा सहजपणे फोडू शकतो.

तंत्रज्ञानाने मानवी जग कितीही सुकर केले असले तरी त्याच्या राजकीय वापरामुळे संघर्ष हे स्वस्त झाले आहेत. १९४५ ते १९९१ मधील सोव्हिएत महासंघ आणि अमेरिका यांच्यातील शीतयुद्धात शस्त्रास्त्र स्पर्धा कितीही तीव्र असली तरी त्या दोघांत करारारूपी संवाद चालू होता. १९६२ साली ‘क्युबन मिसाईल संकट’ म्हणून प्रसिद्ध असलेली घटना घडली होती. यावरून दोन्ही देशांत अणुयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता होती. परंतु, दोन्ही देशांकडून सामंजस्याने हा वाद मिटविण्यात आला. अशा प्रकारचा संवादाचा सध्याच्या जागतिक व्यवस्थेत संपूर्णतः अभाव आहे. देशांतर्गत तणाव इतका वाढला आहे की कोणतेच देश माघार घेण्याची शक्यता कमी आहे. रशिया हे सध्याचे ज्वलंत उदाहरण आहे. 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिका