शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
2
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
3
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
4
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
5
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
6
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
7
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
8
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
9
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
10
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा
11
११ वर्षांच्या मुलीने असा लावला नेपाळमधील ओली सरकारला सुरुंग, तो अपघात घडला आणि....
12
Urban Company IPO लाँच, जबरदस्त ग्रोथ आणि अधिक मूल्यांकन; काय आहे अधिक माहिती, गुंतवणूक करावी का? 
13
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
14
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
15
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
17
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
18
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
19
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
20
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त

चिनी राष्ट्राध्यक्षांसोबतचा पंगा पडला महाग; अलीबाबा गृपचे सर्वेसर्वा जॅक मांना बसला मोठा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2021 15:09 IST

हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र, आता यासंदर्भात ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. (chinas richest man)

ठळक मुद्देअलीबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा यांच्या डोक्यावरील चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा 'ताज' आता उतरला आहे. हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक व्यासपीठावरून चीनच्या रेग्युलेटरी सिस्टमवर कथित भेदभावाचा आरोप केला होता.

बिजिंग - अलीबाबा आणि अँट ग्रुपचे संस्थापक जॅक मा (Jack Ma) यांच्या डोक्यावरील चीनचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्याचा 'ताज' आता उतरला आहे. चिनी रेग्युलेटर्सच्या कारवाईनंतर जॅक मा यांची संपत्ती मोठ्या प्रमाणावर कमी झीली आहे. तर त्यांच्या स्पर्धकांची संपत्ती वाढली आहे. (China Under government scrutiny Jack Ma not chinas richest man anymore)

हुरून ग्लोबल रिच लिस्ट 2019 आणि 2020 मध्ये जॅक मा आणि त्यांच्या कुटुंबीयांची संपत्ती चीनमध्ये सर्वात जास्त होती. मात्र, आता यासंदर्भात ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. आता जॅक मा यांच्यावर बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपनीचे मालक झोंग शानशान, टेनसेंट होल्डिंगचे पोनी मा, ई-कॉमर्स कंपनी अपस्टार्ट कोलिन हुआंग हे आहेत.

चीनला जबर झटका देण्याच्या तयारीत अमेरिका; संसदेत विधेयक सादर, करण्यात आली मोठी मागणी

रेग्युलेटर्सवरील टीकेनंतर जॅक मा यांच्या कंपन्यांवर कारवाई -हुरून लिस्टनुसार, चीनच्या रेग्युलेटर्सकडून अलीबाबा आणि अँट ग्रुपविरोधात केलेल्या कारवाईनंतर जॅक मा यांच्या संपत्तीमध्ये मोठी घट झाली आहे. जॅक मा यांनी 24 ऑक्टोबर 2020 रोजी सार्वजनिक व्यासपीठावरून चीनच्या रेग्युलेटरी सिस्टमवर कथित भेदभावाचा आरोप केला होता. यानंतर त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यावेळी त्यांनी चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यावरही अनेक प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर अँट ग्रुपचा 37 अब्ज डॉलर्सचा आयपीओ टळला होता.

शी जिनपिंग यांच्याकडे बोट -वॉल स्‍ट्रिट जनरलच्या वृत्तानुसार, जॅक मा यांच्या अँट ग्रुपचे आयपीओ रद्द करण्याचा आदेश थेट चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याकडूनच आला होता. यानंतर क्रिसमसच्या पूर्व संध्‍येला, जोवर आपल्या अलिबाबा गृप विरोधातील चौकशी पूर्ण होत नही, तोवर देशाबाहेर जाऊ नये, असा आदेशही जॅकमा यांना देण्यात आला होता. या कारवाईनंतर जॅक मा फार कमी वेळा सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. एवढेच नाही, तर चीन सरकारने त्यांना गायब केल्याचेही वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले होते. चीनमध्ये रेग्युलेटरी नियमांवर टीका करणाऱ्या उद्योजकांना सातत्याने निशाणा केले जात आहे.

अमेरिकेनं भारताकडून घेतलंय 216 अब्ज डॉलरच कर्ज, प्रत्येक नागरिकाच्या डोक्याव लाखोंच ऋण

 

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगJack Maजॅक माbusinessव्यवसाय