शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

भारताला चीनची धडकी! ड्रॅगनच्या ताफ्यात लवकरच हायपरसॉनिक मिसाइलचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 06:28 IST

चीनने आपल्या प्रचंड लष्करी ताफ्यामध्ये हायपरसॉनिक मिसाइलचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क : भारताशी खेटून असलेल्या सीमा असो वा दक्षिण चीन समुद्र असो किंवा मग तैवानशी डोकं लावणे असो वा मग अमेरिकेशी भिडण्याचा प्रयत्न असो. चीनच्या कुरापतींनी सध्या निम्मे जग चिंताक्रांत आहे. त्यातच आता चीनने आपल्या प्रचंड लष्करी ताफ्यामध्ये हायपरसॉनिक मिसाइलचा समावेश करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. जागतिक स्पर्धाहायपरसॉनिक मिसाइल आपल्या ताफ्यात रहावे यासाठी जगभरातील देश प्रयत्न करत आहेत. अमेरिकेने आपल्याकडे हायपरसॉनिक मिसाइल उपलब्ध असल्याचे गेल्याच वर्षी जाहीर केले.रशियाकडेही या मिसाइल निर्मितीची क्षमता आहे. २०१९ मध्ये हायपरसॉनिक मिसाइलची चाचणी घेतल्याचे रशियाने स्पष्ट केले होते.हायपरसॉनिक मिसाइल म्हणजे काय?हे मिसाइल सोडल्यानंतर ते मध्येच त्याचे लक्ष्य बदलू शकते. तसेच त्याचा माग ठेवणे शत्रूपक्षासाठी कठीण होते.चीनने गुप्तरित्या हायपरसॉनिक मिसाइलची निर्मिती केली.मुख्यत: अण्वस्त्रांचा मारा करण्यासाठी हायपरसॉनिक मिसाइलचा वापर करता येऊ शकतो. किमी ताशी वेगाने हायपरसॉनिक प्रवास करू शकते. आवाजाच्या वेगापेक्षाही अधिक असेल वेगबॅलिस्टिक आणि क्रूझ मिसाइल अशा दोन्ही प्रकारची क्षेपणास्त्रे त्यावरून वाहून नेता येऊ शकतात.  भारताकडेही क्षमतासध्या भारत आणि चीनमध्ये वरचेवर खटके उडत आहेत. अशा स्थितीत भारताला चीनकडून धोका आहे. चीनकडे हायपरसॉनिक मिसाइलमुळे भारतातील कोणतेही शहर आता चीनच्या मारकटप्प्यात आले आहे. भारताकडील क्षेपणास्त्रेही चीनच्या कोणत्याही शहराचा वेध घेऊ शकतात.हायपरसॉनिक मिसाइलचे तंत्रज्ञान भारतालाही अवगत असून त्याच्या निर्मितीची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यावर आहे.मिसाइलच्या चाचण्याअलीकडेच चिनी लष्कराने हायपरसॉनिक ग्लाइड व्हेइकल अंतराळात पाठवले. त्याला लाँग मार्च २सी रॉकेट, असे नाव देण्यात आले होते. ऑगस्टमध्ये ही चाचणी घेण्यात आली. मिसाइलने पृथ्वीला एक प्रदक्षिणा मारली आणि नंतर लक्ष्याच्या दिशेने कूच केले.परंतु लक्ष्याचा भेद करण्याच्या १२ मैल आधी मिसाइल भरकटले. मिसाइलची चाचणी यशस्वी झाल्याचा दावा चीनने केला आहे. चीनच्या या दाव्यामुळे अंतराळातील स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :chinaचीनIndiaभारत