शहरं
Join us  
Trending Stories
1
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
2
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
3
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
4
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
5
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
6
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
7
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
8
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
9
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
10
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
11
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
12
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
13
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
14
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
15
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
16
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
17
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
18
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
19
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
20
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल

अमेरिकेसाठी धोक्याची घंटा! चीन तयार करतोय 'स्टील्थ बॉम्बर', अणुहल्ला करण्याची जबरदस्त क्षमता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 15:01 IST

चीन सध्या एक दूरपर्यंत मारा करता येईल अशा स्टील्थ बॉम्बरच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. चीन तयार करत असलेले स्टील्थ बॉम्बर अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो.

चीन सध्या एक दूरपर्यंत मारा करता येईल अशा स्टील्थ बॉम्बरच्या निर्मितीमध्ये व्यग्र आहे. चीन तयार करत असलेले स्टील्थ बॉम्बर अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरू शकतो. कारण याच्या माध्यमातून बिजिंग, गुआम येथून अमेरिकी ठिकाणांवर अणुहल्ला करण्याची क्षमता चीनकडे निर्माण होणार आहे. चीनी सैन्यातील एका विश्लेषकानं याबाबतचा खुलासा केला आहे. (china stealth bomber xian h 20 strategic bomber could be able to hit us guam base with a nuke)

अमेरिकेसाठी चीननं तयार केलेले बॉम्बर धोक्याची घंटा ठरू शकतो. झियान एच-२० स्ट्रॅटेजिक बॉम्बरची कॉम्युटर जनरेटेड छायचित्र जारी करण्यात आली आहेत. नव्या पिढीच्या या फायटर जेटची पहिली झलक प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून यावर काम सुरू आहे. चीनच्या या अत्याधुनिक फायटर बॉम्बर जेटमध्ये दोन अॅडजेस्टेबल टेल विंग्स, एक हवाई रडार आणि कॉकपिटच्या दोन्ही बाजूला एअर इनटेक देण्यात आले आहेत. याच डिझाईन अमेरिकेच्या USAF B-2 Spirit याच्यासारखंच आहे. 

स्टील्थ बॉम्बरमध्ये नेमकं काय?‘नोरिन्को’ मासिकाच्या मुखपृष्ठावर चीनच्या नव्या स्टील्थ बॉम्बरचं छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आलं आहे. 'आकाशातील युद्धाचा देव' अशा मथळ्यासह फोटो छापण्यात आला आहे. चीनी स्टील्थ बॉम्बर करड्या रंगाचं अत्याधुनिक युद्धजन्य परिस्थितीत वापरण्यात येणार फायटर जेट असून रडार-अॅबसॉर्बेंट प्रणानीलं सज्ज आहे. याशिवाय, याचं डिझाइन असं आहे की रडारच्या तावडीतही सापडत नाही. माध्यमांमधील माहितीनुसार, झियान एच-२० स्ट्रॅटिजिक बॉम्बर अणुबॉम्ब, हायपरसोनिक आणि क्रूज मिसाइल घेऊन जाण्याची क्षमता ठेवतो. २०० टनांपर्यंतचं वजन हे विमान सहजपणे पेलू शकतं. तर विमानाचा सर्वोत्तम वेग ९८० किलोमीटर प्रतितास इतका आहे.  

टॅग्स :chinaचीनUSअमेरिका