गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या चीन आणि भारताच्या सीमेवर तणाव आता कमी झाला होता. पु्न्हा एकदा भारत आणि चीनमधील संबंध पुन्हा रुळावर आले होते. असं असताना आता चीनने पुन्हा आपल्या कारवाया सुरु केल्या आहेत. पीपल्स लिबरेशन आर्मीने उंचावरील प्रदेशांसह कठीण परिस्थिती असलेल्या दुर्गम भागातील सीमा चौक्यांना वीजपुरवठा वाढवला आहे.
डोनाल्ड ट्रम्प भारताचे मित्र की शत्रू? भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर स्पष्टच बोलले..!
याबाबत पीएलए डेलीने या महिन्याच्या सुरुवातीला वृत्त दिले होते. यात त्यांनी चीन-भारत सीमेवरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या शिनजियांग उइगुर स्वायत्त प्रदेशातील झैदुल्ला आणि तिबेट स्वायत्त प्रदेशातील न्गारी प्रांतातील सीमा चौक्या पूर्णपणे राष्ट्रीय पॉवर ग्रिडने व्यापल्या आहेत. चीन सीमावर्ती चौक्यांना वीजपुरवठा वाढवून आपल्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
एका अहवालात म्हटले आहे की, बहुतेक सीमा चौक्यांद्वारे वापरलेली वीज आणि अक्षय ऊर्जा सैनिकांना हिवाळ्यात उबदार आणि सुरक्षित राहण्यासाठी मजबूत आधार देते. यामुळे सैन्यातील सर्व उंचावरील सीमा सुरक्षा चौक्यांची ऊर्जा सुरक्षा वाढणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. या उपक्रमामुळे उंचावर तैनात असलेल्या सीमा सैनिकांना येणाऱ्या दीर्घकालीन समस्या दूर झाल्या आहेत, यामध्ये पिण्याचे पाणी, गरम पाणी, ऑक्सिजनची सुविधा यांचा समावेश आहे, असा दावा करण्यात आला आहे.
बऱ्याच महिन्यांपासून प्रयत्न होते
चीन बऱ्याच महिन्यांपासून आपल्या सीमावर्ती सैनिकांना वीजपुरवठा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे आणि हा देखील त्यांच्या रणनीतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. यामुळे, लष्कर आणि राष्ट्रीय ऊर्जा प्रशासनाने २०१६ च्या अखेरीस लष्करासाठी पॉवर ग्रिड बांधण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय ऊर्जा सेवा नेटवर्कशी जोडण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला. गेल्या वर्षी जानेवारीपर्यंत, ७०० सीमा चौक्या चीनच्या राष्ट्रीय ग्रीडशी जोडल्या होत्या.
लढाऊ उपकरणे, कमांड आणि कंट्रोल सिस्टीम आणि ऊर्जा-केंद्रित माहिती उपकरणे कार्यक्षम आणि स्थिर वीज पुरवठ्याशी जोडल्याने सैन्याच्या आपत्कालीन व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा झाली आहे.