शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
3
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
4
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
5
राज ठाकरे मविआत सामील होणार की केवळ उद्धवसेनेशी युती करणार? सुप्रिया सुळेंचे विधान चर्चेत
6
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
7
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
8
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
9
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
10
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
11
French Open 2025: नोवाक जोकोविचचं विजेतेपदाचं स्वप्न भंगलं, सेमीफायनलमध्ये दारूण पराभव!
12
FD rates: 'या' ५ बँका एफडीवर देताहेत सर्वाधिक व्याज, लिस्टमध्ये सरकारी बँकांचाही समावेश; पाहा कोणत्या आहेत बँका
13
पालकांचं निधन, घटस्फोट अन् नवऱ्याकडे लेकाची कस्टडी; मराठी अभिनेत्रीने उलगडलं खडतर आयुष्य
14
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”
15
बॉलिवूड, साऊथ अन् मराठी कलाकार! रणबीरच्या 'रामायण'ची संपूर्ण स्टारकास्ट, आदिनाथ कोठारेही दिसणार
16
Tarot Card: दुःखावर सुखाची फुंकर घालणारा आठवडा; जाणून घ्या साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
KL राहुल 'नॅशनल ड्युटी स्टार्ट विथ ब्युटीफुल सेंच्युरी'! १८ वर्षांचा दुष्काळ संपवण्याची दिली 'गॅरेंटी'
18
"...आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार"; राहुल गांधींना भाजपाचं प्रत्युत्तर
19
मेडिकल सायन्सचा चमत्कार! नव्या IVF टेक्निकने पालक ठरवणार मुलाच्या डोळ्यांचा, त्वचेचा रंग
20
“STचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्यभर धुळे -नंदुरबार पॅटर्न राबविणार”; प्रताप सरनाईकांची माहिती

चीनने कृत्रिम बेट बनवू नये -अमेरिका

By admin | Updated: May 30, 2015 23:41 IST

दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याची प्रक्रिया त्वरित आणि कायमची थांबविण्यात यावी, असे आवाहन अमेरिकेने चीनला केले आहे.

वॉशिंग्टन : दक्षिण चीन समुद्रात कृत्रिम बेट तयार करण्याची प्रक्रिया त्वरित आणि कायमची थांबविण्यात यावी, असे आवाहन अमेरिकेने चीनला केले आहे. सिंगापूरमधील शांग्री-ला चर्चेत बोलताना अमेरिकी संरक्षणमंत्री अ‍ॅश्टन कार्टर यांनी कृत्रिम बेट निर्माण करण्याची चीनची कृती आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन असल्याचे म्हटले. चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला दावा करतो आणि या भागातील इतर देशही चीनसारखाच दावा करतात. या मुद्यावरून तेथे हळूहळू तणाव वाढत आहे. या भागात शांतता राहावी यासाठी अशा प्रकारची कृत्रिम बेटे निर्माण केली जाऊ नयेत. व्हिएतनाम, फिलिपाईन्स, मलेशिया आणि तैवाननेही दक्षिण चीन समुद्राचा काही भाग ताब्यात घेतल्याचे कार्टर यांनी मान्य केले; मात्र चीनने हे काम सर्वात वेगाने व सर्वाधिक प्रमाणात केल्याचे ते म्हणाले. चीनने अवघ्या १८ महिन्यांत तब्बल दोन हजार एकर क्षेत्र ताब्यात घेतले आहे. अशा प्रकारची कृत्ये थांबवण्यात यायला हवीत, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)कार्टर यांच्या या निवेदनाच्या एक दिवस आधी अमेरिकी सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी चीनने कृत्रिम बेट निर्माण करून तेथे दोन तोफखाने तैनात केल्याचे म्हटले होते. अमेरिकेच्या या आवाहनावर चीनने मुरब्बी पद्धतीने प्रतिक्रिया दिली. शांग्री-ला चर्चेत सहभाग घेत असलेले चिनी प्रतिनिधी झाओ शियाओझू यांनी चीनची कृती योग्य आणि वैध असल्याचे म्हटले आहे. बांधकामाद्वारे शांतता व स्थैर्य निर्माण करण्याच्या चीनच्या प्रयत्नांवर टीका करणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले. दक्षिण चीन समुद्रात आपण करीत असलेली कृती योग्य असून सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक असल्याचे चीनने यापूर्वी अनेकदा म्हटले आहे.