शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
2
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
3
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
4
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
5
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
6
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
7
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
8
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
9
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story
10
Shravan Shanivar 2025: शनिवारी कसे करावे अश्वत्थ मारुती पूजन? पिंपळाच्या झाडाचीही पूजा महत्त्वाची!
11
नागरिकांची झोप उडवणाऱ्या चड्डी- बनियान टोळीला पकडण्यात पोलिसांना यश!
12
आशा भोसलेंनी पुण्यातील आलिशान फ्लॅट विकला! एकाच झटक्यात कमावले इतके कोटी, तब्बल ४२ टक्के वाढ
13
कुठल्याही देवावर विश्वास नाही, कुठलाही धर्म मानत नाही, या १० देशांमधील बहुतांश लोक आहेत नास्तिक
14
Viral Video: भल्यामोठ्या अजगराला दुचाकीला बांधून फरफटत नेलं, संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड!
15
वानखेडे स्टेडियममध्ये सुनील गावसकर, शरद पवार यांचा होणार गौरव, MCA उभारणार पुतळा
16
जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!
17
Prajwal Revanna: माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा अत्याचार प्रकरणात दोषी, उद्या शिक्षेची घोषणा
18
Dahi Handi 2025: गोविंदा आला रे...! सरकार संरक्षण देणार; राज्यातील १.५० लाख गोविंदांचा विमा काढणार...
19
मानहानी प्रकरणात कंगनाला मोठा धक्का; उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका, नेमकं प्रकरण काय?
20
'हल्ली मुली नग्न होऊन पैसे कमावत आहेत'; साध्वी ऋतंभरा यांच्या विधानाने नवा वाद

चीनच्या लुलियांग प्रांतात इमारतीला भीषण आग, 26 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 13:39 IST

ही घटना आज सकाळी 6.50 च्या सुमारास घडली.

चीनच्या शांक्सी प्रांतातील लुलियांग येथील कोळसा कंपनीच्या इमारतीला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. ही घटना आज (16 नोव्हेंबर) सकाळी 6.50 च्या सुमारास घडली. या घटनेनंतर आतापर्यंत 63 जणांना इमारतीतून बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी 51 जणांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चीनच्या स्थानिक सरकारी मीडिया सीसीटीव्हीच्या वृत्तानुसार, शांक्सी प्रांतातील लुलियांग शहरातील लिशी जिल्ह्यातील योंगजू कोल कंपनीच्या चार मजली इमारतीमध्ये आग लागली. स्थानिक वेळेनुसार सकाळी 6.50 च्या सुमारास ही आग लागली. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. तसेच, आगीचे कारण तपासले जात आहे. इमारतीला लागलेल्या आगीत 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर इमारतीतून एकूण 63 लोकांना बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी 51 जणांना उपचारासाठी लुलियांग फर्स्ट पीपल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, सरकारी माध्यमांनी वृत्त दिले आहे की, चीनमध्ये ढिलाई सुरक्षा मानके आणि खराब अंमलबजावणीमुळे व्यावसायिक अपघात सामान्य आहेत. या वर्षी जुलै महिन्यात देशाच्या उत्तर-पूर्व भागात शाळेच्या जिमचे छत कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला होता. त्याच्या एक महिना आधी उत्तर-पश्चिम चीनमधील बार्बेक्यू रेस्टॉरंटला लागलेल्या आगीत 31 जणांचा मृत्यू झाला होता.

चीनच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटनाचीनमध्ये वारंवार आगीच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी देशव्यापी मोहीमही सुरू करण्यात आली होती. या वर्षी एप्रिल महिन्यात बीजिंगमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत 29 लोकांचा मृत्यू झाला आणि इतर लोकांना जीव वाचवण्यासाठी खिडक्यांमधून उडी मारावी लागली होती. इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना 2015 मध्ये चीनमधील तिआनजिन येथे घडली होती, जेव्हा रसायनाच्या गोदामात झालेल्या स्फोटामुळे 165 लोकांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :chinaचीनfireआग