शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

Monkey B Virus: चीनमध्ये आढळला नवा व्हायरस, नोंदवला गेला पहिला मृत्यू; जाणून घ्या खतरनाक व्हायरसची लक्षणं!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 8:58 PM

Monkey B Virus चीननंही या व्हायरसच्या संक्रमणाचे वृत्त मान्य केले आहे. चीननं या व्हायरसला Monkey B Virus असे नाव दिले आहे.

बीजिंग - जगभरात डेल्टा व्हेरिएंट व्हायरनं थैमान माजवला असताना चीनमध्ये Monkey B Virus या नव्या व्हायरसमुळे एका व्यक्तिचं निधन झाल्यानं खळबळ माजली आहे. माकडांतून हा व्हायरस पसरला जात असल्याचा दावा ग्लोबल टाईम्सनं केला आहे. चीननंही या व्हायरसच्या संक्रमणाचे वृत्त मान्य केले आहे. चीननं या व्हायरसला Monkey B Virus असे नाव दिले आहे. आधीच कोरोना व्हायरससाठी चीनला जबाबदार धरले जात आहे आणि त्यात या नव्या व्हायरसनं जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. मार्च २०२१मध्ये या व्हायरसमुळे दोन माकडांच्या मृत्यूची नोंद झाली होती, पण आता या व्हायरसमुळे माणसाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेली व्यक्ती ही पशुवैद्यकीय सर्जन होती. ( China reports first human death from Monkey B Virus. All you need to know) 

Monkey B virus हा प्रथमच आढळलेला नसल्याचा दावाही अनेकांनी केला आहे. Monkey B virus हा आधीपासून अस्तित्वात आहे, परंतु माणसाला याची लागण होण्याची अन् त्यामुळे मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. माकडांमुळे या व्हायरसचा प्रसार होत आहे. माकडांची थुंकी, विष्ठा, लघवी, मेंदू आणि पाठीच्या कण्यात या व्हायरसचे अस्तित्व सापडते. माणसांच्या central nervous symptomsवर हा व्हायरस हल्ला करतो, असे US National Library of Medicineचे म्हणणे आहे. या व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या लोकांचा मृत्यूदर हा ७० ते ८० टक्के आहे. म्हणजेच जर १०० लोकांना याची लागण झाली, तर त्यापैकी ७० ते ८० लोकांचा मृत्यू होऊ शकतो. 

कोरोना व्हायरससारखीच याचीही लक्षणं आहेत. ताप येणं, अंगदुखी, थंडी वाजणे, थकवा जाणवणे आणि डोकं दुखणं ही Monkey B virusनं संक्रमित व्यक्तित आढळलेली लक्षणं आहेत. याहीपुढे Monkey B virusमुळे व्यक्तीच्या मेंदू व पाठीच्या कण्यावर सूजही येऊ शकते. त्यामुळे त्या व्यक्तीला मेंदू संबंधित गंभीर आजार होऊ शकतात आणि त्याचा मृत्यूही होऊ शकतो.

संक्रमित माकडाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिला या व्हायरसची लागण होऊ शकते, असा दावा China CDC Weekly journalने केला आहे. पण, व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे या व्हायरसचा फैलाव होण्याची भीती फार कमी आहे. पशुवैद्य, पशुंसाठी काम करणारे कर्मचारी आणि प्रयोगशाळेतील कामगार यांना या व्हायरसपासून अधिक धोका आहे. ( Chinese vet, 53, dies of deadly Monkey B virus after catching killer disease in lab) 

इतिहास काय सांगतो... १९३२ साली हा व्हायरस सर्वात आधी आढळला होता.  US CDCच्या वृत्तानुसार त्यानंतर ५० व्यक्तींना त्याची लागण झाली आणि त्यापैकी २१ जणांचा मृत्यू झाला. १९९७साली या व्हायरसमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीची अखेरची नोंद होती. त्यानंतर आता चीनमध्ये हा व्हायरस सापडला आहे.  

 

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्याMonkeyमाकड