शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चीनने 'बेपत्ता' परराष्ट्रमंत्र्याला पदावरून हटवले, वांग यी यांच्याकडे दिली जबाबदारी! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2023 18:09 IST

मंगळवारी माहिती देताना चीनच्या अधिकृत माध्यमांनी सांगितले की, चीनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चीनमधील जगातील सर्वात मोठी कंपनी अलिबाबाचे संस्थापक जॅक मा हे काही वर्षे बेपत्ता झाले होते. यानंतर आता चीनचे परराष्ट्रमंत्री किन गांग गेल्या महिनाभरापासून बेपत्ता झाले आहेत. दरम्यान, जवळपास महिनाभरापासून बेपत्ता असलेल्या किन गांग यांना चीनने परराष्ट्रमंत्री पदावरून हटवले आहे. आता त्यांच्या जागी नव्या परराष्ट्रमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली आहे. 

मंगळवारी माहिती देताना चीनच्या अधिकृत माध्यमांनी सांगितले की, चीनचे नवे परराष्ट्र मंत्री म्हणून वांग यी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर बेपत्ता किन गांग यांना परराष्ट्रमंत्री पदावरून हटवण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप ५७ वर्षीय किन गांग यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. यासोबतच त्यांच्या जागी परराष्ट्र मंत्रालयाचे कामकाज कोण पाहत होते, याबाबत सुद्धा कोणतीही माहिती मिळालेली नाही.  किन गांग यांना २५ जून रोजी शेवटचे पाहिले गेले होते, जेव्हा ते एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी कार्यक्रमात ते रशियन, श्रीलंकन ​​आणि व्हिएतनाम अधिकार्‍यांसह बैठकांना उपस्थित होते. त्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. दरम्यान, किन गांग हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे अत्यंत जवळचे मानले जातात. परराष्ट्रमंत्री आणि स्टेट काऊंसेलर पदावर असताना त्यांची प्रगती दुप्पट वेगाने झाल्याचेही म्हटले जात आहे. आता ते रहस्यमयी पद्धतीने गायब झाल्याने त्याचीही चर्चा जोरदार सुरु झाली आहे. 

चीनच्या सरकारी मीडियाने शिन्हुआने नवीन घडामोडीबाबत सांगितले की, "चीनच्या सर्वोच्च विधिमंडळाने मंगळवारी एक विशेष सत्र बोलावले आणि वांग यी यांना नवीन परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्त करण्यासाठी मतदान केले." यापूर्वी, किन गांग यांच्या मंत्रालयाने यासंबंधी माहिती देताना सांगितले होते की,  किन गांग हे आरोग्याच्या कारणांमुळे कामापासून दूर आहेत. मात्र त्यांच्या आजाराबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती.

टॅग्स :chinaचीन