शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Video : आपल्याच माणसांच्या पैशांवर China चा डल्ला?; बँकेतील रक्कम वाचवण्यासाठी रणगाड्यांचे संरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 10:46 IST

तब्बल ४० बिलियन युआन म्हणजेच ६ बिलियन डॉलर्स चीनच्या बँक सिस्टममधून गायब झाल्याचा दावा केला जात आहे.

चीनच्या रस्त्यांवर रणगाड्यांची रांग पाहून अनेकांना धक्का बसला आहे. स्थानिक माध्यमांचा हवाला देत Reddit युझर्सनं ते फुटेज शेन्डॉंग क्षेत्रातील रिझाओ येथील असल्याचं म्हटलं आहे. येथे एका बँकेची स्थानिक शाखा वाचवण्यासाठी रस्त्यांवर रणगाडे उतरवण्यात आले होते. अनेक रणगाडे रांगेत उभे असून ते लोकांना त्या ब्रान्च पर्यंत जाण्यापासून रोखत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

या व्हिडीओमध्ये स्थानिक लोकांमध्ये संताप असल्याचंही दिसून येत आहे. दरम्यान, Reddit युझरनं या घटनेची तुलना १९८९ मधील तियानमेन घटनेशी केली आहे. त्यावेळी शेकडो रणगाड्यांचा वापर लोकशाहीच्या समर्थकांचा विरोध हाणून पाडण्यासाठी केला जात होता. हा मुद्दा पहिल्यांदा एप्रिल महिन्यात समोर आला होता. साऊथ चायना मॉर्निग पोस्टनं एका लेखात हेनान आणि अन्हुई क्षेत्रातील लोकांना सिस्टम अपग्रेडमुळे बँक खात्यांचा अॅक्सेस दिला जात नसल्याचं म्हटलं होतं. 

तेव्हापासून युझोऊ शिनमिनशेंग (Yuzhou Xinminsheng) व्हिलेज बँक, शँगकाऊ हुईमिन काउंटी बँक (Shangcai Huimin County Bank), झेचेंग हुआनगुआई कम्युनिटी बँक ( Zhecheng Huanghuai Community Bank) आणि हेनान प्रांतातील यू ओरिएंटल कंट्री बँक ऑफ कायफेंग (Oriental Country Bank of Kaifeng), नजीकच्याच अनहुई प्रांतातील गुझेन शिंनहुआइहे व्हिलेज बँक (Guzhen Xinhuaihe Village Bank) प्रभावित झाल्या आहेत. दरम्यान, एका लेखात या घटनेचा उल्लेख इतिहासाची पुनरावृत्ती होते अशा पद्धतीनं केला आहे. जर रणगाड्यांच्या ऑपरेटर्सनाही आपले पैसे काढता आले नाही तर?, असा प्रश्न एका युझरनं केला आहे. तब्बल ४० बिलियन युआन म्हणजेच ६ बिलियन डॉलर्स चीनच्या बँक सिस्टममधून गायब झाल्याचा दावा केला जात आहे. तसंच लोक आपले पैसे काढण्याची मागणी करत आदोलन करत आहेत. शाखेतील पैसे हे आता काढता येणार नसून ते गुतवणूकीसाठी असल्याचं बँकेनं सांगितल्याचा दावा वॉल स्ट्रिट सिल्व्हरनं केला आहे.

टॅग्स :chinaचीनbankबँकMONEYपैसा