शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

चीनचं भारताविरोधात कटकारस्थान, सीमेवर वसवली ६२४ गावं, सैनिक तैनात करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 13:02 IST

China India Conflict : चीनने भारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे.

नवी दिल्ली : चीन आणि भारत यांच्यातील सीमा विवाद अनेक वर्षांपासून सुरू आहे. या मुद्द्यावरून दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये संघर्ष झाल्याचेही वृत्त आहे. दरम्यान, आता चीननेभारतासोबतच्या विवादित सीमेवर गावे वसवली आहेत, असे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. वॉशिंग्टन थिंक टँक सेंटर फॉर इंटरनॅशनल अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज (CSIS) च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. 

चीन हिमालयातील भारतासोबतच्या विवादित सीमेवरील शेकडो गावे वसवत असल्याचे १६ मे रोजी सीएसआयएसच्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. न्यूजवीकच्या रिपोर्टमध्ये सॅटेलाइट फोटोंचा हवाला देण्यात आला आहे. यामध्ये २०२२ ते २०२४ च्या फोटोंची तुलना करण्यात आली. चीनने गेल्या ४ वर्षात ६२४  गावे बांधली आहेत.

सीएसआयएस अहवालात म्हटले आहे की, २०१८ ते २०२२ दरम्यान चीनने ६२४ गावे बांधली आहेत आणि त्यांचे काम सुरू आहे. अरुणाचल प्रदेशाजवळ ४ वेगवेगळ्या ठिकाणी ही गावे वसवली जात आहेत. अरुणाचल हा भारताचा भाग आहे, तर चीनकडून हा आपला भूभाग असल्याचा दावा करण्यात येतो. या वसवलेल्या गावांमध्ये गुप्तपणे सैनिक तैनात केले जाऊ शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

दरम्यान, भारत आणि चिनी सैनिकांमध्ये सीमा वादावरून संघर्ष होताना दिसतो. डिसेंबर २०२० मध्ये चीन आणि भारताच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला होता. तसेच, १९६२ मध्ये दोन्ही देशांमध्ये सीमेवरून युद्ध झाले होते. गेल्या ३ वर्षात चकमकीही पाहायला मिळाल्या आहेत. सीमावादावर कोणताही स्पष्ट तोडगा निघालेला नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

चीन बदलतोय डेमोग्राफीसीमेजवळ वेगाने होत असलेला विकास चीनच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या क्षमतेचा दाखला आहे. गेल्या वर्षी याराओ जवळ नवीन रस्ता आणि दोन हेलिपॅडही बांधण्यात आले. तसेच, याराओ येथे ३९०० मीटर उंचीवर असलेल्या नवीन इमारती बांधण्यातही चीनला यश आल्याचे अहवालात म्हटले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिबेटी आणि हान लोकसंख्येबाबत चीनही वेगळा दृष्टिकोन दाखवत आहे.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगIndiaभारत