शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

चीनची नवी चाल उघड, हिंदी समजणाऱ्या तिबेटी आणि नेपाळी लोकांची सैन्यात भरती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 14:58 IST

चीनची आणखी एक नवीन चाल उघड झाली आहे. गुप्तचर अहवालानुसार चिनी लष्करानं आपल्या गुप्तचर शाखेत नेपाळी आणि तिबेटियन लोकांची भरती सुरू केली आहे.

चीनची आणखी एक नवीन चाल उघड झाली आहे. गुप्तचर अहवालानुसार चिनी लष्करानं आपल्या गुप्तचर शाखेत नेपाळी आणि तिबेटियन लोकांची भरती सुरू केली आहे. नेपाळी आणि तिबेटी लोक ज्यांना हिंदीचं ज्ञान आहे अशा लोकांकडून भारतीय लष्कराचं इंटरसेप्टेड वायरलेस संदेश आणि इतर गुप्तचर संदेश समजून घेऊन त्यांची माहिती देणं असा यामागचा चीनचा उद्देश आहे. गलवान हिंसाचारानंतर चीन आणि भारत यांच्यातील संबंध खूपच बिघडले आहेत. चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर सीमेवरील परिस्थिती सुधारण्यासाठी काम केलं जात होतं. त्यातच ९ डिसेंबरला पीएलएने (चीनी लष्कर) अरुणाचलमधील तवांगमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला, जो भारतीय सैनिकांनी हाणून पाडला.

चीनमधील लोकांना त्यांच्या स्थानिक भाषेशिवाय इतर भाषा माहित नाहीत. त्यामुळे त्यांना अडचणीला सामोरं जावं लागत आहे. आता चीनच्या गुप्तचर विभागात नेपाळी आणि तिबेटी लोकांची भरती केली जात आहे, ज्यासाठी त्यांना हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. जेणेकरून त्यांना भारतीय लष्कराचा संदेश सहज समजू शकेल. बहुतेक वेळी चिनी सैन्याला गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीची उकल करण्यात भाषेमुळे अडचणी येतात.

भारतीय मेसेज डीकोड करण्यासाठी भरतीज्यांची नियुक्ती केली जाईल त्यांच्याकडून भारतीय भाषेतील मेसेज त्वरित समजून घेतला जाईल. जेणेकरून पुढील कारवाई करण्यात मदत होईल असा चीनचा यामागचा उद्देश आहे. भारतीय लष्कराच्या गटाचे म्हणणे ऐकणे आणि ते चिनी सैन्याला सांगणे हा या भरतीचा उद्देश आहे. चिनी सैन्य तिबेट स्वायत्त प्रदेश TAR मध्ये ही भरती करत आहे. भरती झालेले सर्व लोक भारताला लागून असलेल्या सीमावर्ती भागात राहणार आहेत. हा भाग नेपाळपासून लडाखपर्यंत येतो.

राजनाथ सिंह यांनी संसदेत उत्तर दिले९ डिसेंबर रोजी गस्तीदरम्यान दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक झाली होती. यामध्ये दोन्ही बाजूंच्या जवानांना किरकोळ दुखापत झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि एकही सैनिक गंभीर जखमी झाला नाही. 

"जोपर्यंत देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार आहे, तोपर्यंत कोणी एक इंचही जमीन काबीज करू शकत नाही", असे गृहमंत्री अमित शहा म्हणाले. अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले. संसदेत विरोधकांनी या मुद्द्यावर चर्चेची मागणी केली.

टॅग्स :chinaचीन