शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

CoronaVirus: चीननं लपवली होती कोरोना मृतांची संख्या; नवी आकडेवारी पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2020 15:47 IST

Coronavirus चीनमधील मृतांच्या संख्येत अचानक ३९ टक्क्यांनी वाढ

बीजिंग: सध्या जगभरात कोरोनानं थैमान घातलं असून बाधितांचा आकडा २० लाखांच्या पुढे गेला आहे. चीनच्या वुहानमधून जगभरात पोहोचलेल्या कोरोना विषाणूनं इटली, अमेरिका, ब्रिटन, स्पेनमध्ये हजारोंचे बळी घेतले. चीनच्या तुलनेत या देशांमधल्या मृतांचा आकडा अतिशय मोठा आहे. मात्र आता अचानक चीननं मृतांच्या आकड्यात वाढ केली आहे. त्यामुळे चीन सरकार कोरोनासंदर्भातली माहिती आणि आकडेवारी जगापासून लपवतंय का, असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे.चीनच्या वुहानमध्ये कोरोनामुळे जवळपास ४ हजार जणांचा मृत्यू झाल्याची नवी आकडेवारी समोर आली आहे. एका सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून वुहान सरकारनं कोरोनामुळे मृत पावलेल्यांची संख्या दिली आहे. वुहानमध्ये कोरोनामुळे ३ हजार ८६९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोस्टमध्ये आहे. विशेष म्हणजे आधीच्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या जवळपास ५० टक्क्यांनी जास्त आहे. वुहानमधील सरकारनं मृतांचा आकडा अचानक १ हजार २९० नं वाढवल्यानं संशय व्यक्त केला जात आहे. वुहानमधून कोरोनाचा विषाणू चीनमध्ये पसरला. मात्र चीननं कोरोनावर लवकर नियंत्रण मिळवलं. त्या तुलनेत अतिशय उत्तम आरोग्य सुविधा असलेल्या अमेरिकेत आणि युरोपीय देशांमध्ये मात्र कोरोनानं हाहाकार माजवला. कोरोना प्रकरणात संपूर्ण जग चीनकडे संशयानं पाहत आहे. त्यात आता वुहानमधून आलेल्या आकडेवारीनं भर पडली आहे. वुहानमधील कोरोना मृतांच्या संख्येत वाढ करण्यात आल्यानं साहजिकच संपूर्ण देशातल्या मृतांचा आकडादेखील वाढला आहे. कोरोनामुळे चीनमध्ये ४ हजार ६३२ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. आधीच्या तुलनेत ही संख्या ३९ टक्क्यांनी जास्त आहे.वुहानमधल्या प्रयोगशाळेतूनच कोरोना पसरल्याचा संशय अमेरिकेला आहे. या संदर्भात त्यांनी तपासदेखील सुरू केला आहे. पाश्चिमात्य देशांकडून कोरोना प्रकरणात दबाव वाढू लागताच चीननं अचानक वुहानमधील मृतांचा आकडा वाढवला आहे. त्यामुळे चीनबद्दलचा संशयदेखील वाढला आहे. संपूर्ण चीनमध्ये कोरोनाचे ८२ हजार ३६७ रुग्ण आढळून आले. यातले ५० हजार ३३३ रुग्ण एकट्या वुहानमधले आहेत. 

नोकरीवरून काढून टाकाल तर याद राखा! पंतप्रधान नरेंद्र मोदींची नजर आहे

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन