शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चीनने तोडले अकलेचे तारे ! म्हणे दहशतवादविरोधी लढाईत पाकिस्तानने दिले खूप मोठे 'बलिदान'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 17:29 IST

दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्यावरुन अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर चीनने पाकिस्तानची पाठराखण केली आहे.

ठळक मुद्देपाकिस्तानात दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रय स्थान असून या मुद्यावर अमेरिका गप्प बसू शकत नाही.

बिजींग, दि. 22 - दहशतवाद्यांना आश्रय देण्याच्या मुद्यावरुन अमेरिकेने पाकिस्तानला इशारा दिल्यानंतर चीनने पाकिस्तानची पाठराखण केली आहे. दहशतवादाविरोधात पाकिस्तान आघाडीवर राहून लढाई लढत आहे. पाकिस्तानने या लढाईत मोठे बलिदान दिले असून, त्यांचे योगदानही मोठे आहे असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग म्हणाल्या.

पाकिस्तानात दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रय स्थान असून या मुद्यावर अमेरिका गप्प बसू शकत नाही. पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे चालूच ठेवले तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी ट्रम्प यांनी पाकिस्तानला दिली. त्यानंतर चीनने पाकिस्तानची पाठराखण केली आहे. 

अफगाणिस्तानमध्ये ब-याच वर्षांपासून अमेरिकेची लढाई सुरु आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी आणखी सैन्य अफगाणिस्तानात पाठवण्याचे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. ट्रम्प यांच्या पाकिस्तान संदर्भातल्या वक्तव्यावर बोलताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या ह्युआ च्युनयिंग म्हणाल्या की, दहशतवादाविरोधात पाकिस्तान आघाडीवर राहून लढाई लढत आहे. पाकिस्तानने या लढाईत मोठे बलिदान दिले असून, त्यांचे योगदानही मोठे आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने पाकिस्तानच्या या दहशतवाद विरोधी लढयाची दखल घेतली पाहिजे असे च्युनयिंग म्हणाल्या. 

'पाकिस्तान दहशतवाद्यांचं आश्रयस्थान' पाकिस्तान नेहमी हिंसा पसरवणा-यांना, दहशतवाद्यांना आश्रय देत आला आहे.  अमेरिकेकडून दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आलेल्या 20 संघटना अफगाणिस्तान आणि पाकिस्तानात सक्रिय आहेत.  पाकिस्तान जर अफगाणिस्तानातील आमच्या कारवाईला सहकार्य करणार असेल तर त्यांच्याकडे मिळवण्यासाठी असे बरेच काही असेल, मात्र पाकिस्तान जर दहशवाद्यांसाठी आश्रयस्थान बनणार असेल तर मात्र याचे परिणाम भोगावे लागतील, असाही इशारा ट्रम्प यांनी यावेळी दिला. 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला पुन्हा एकदा फटकारले. पाकिस्तान म्हणजे दहशतवाद्यांसाठी स्वर्ग असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. फोर्ट मायर या ठिकाणी अमेरिकन सैनिकांशी संवाद साधत असताना त्यांनी पाकिस्तानला हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी अफगाणिस्तानसंदर्भात नव्या धोरणांची घोषणादेखील केली.  

यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रय स्थान असल्याची टीका केली होती.  पाकिस्तान, अफगाणिस्तानसह जगातील अनेक भागांमध्ये पुढची काही दशके अस्थिरता कायम राहील. अफगाणिस्तान, पाकिस्तान हे देश नव्या दहशतवादी संघटनांसाठी सुरक्षित आश्रय स्थाने ठरु शकतात  असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते.