शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चीनमध्ये सापडला सोन्याचा सर्वात मोठा खजिना; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 17:30 IST

China Gold Reserves Update: चीन जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे.

China Gold Reserves:चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. आता चीनला सोन्याचा आणखी मोठा खजिना सापडला आहे. चीनला त्यांच्या हुनान प्रांतात 82.8 अब्ज डॉलर्स इतका मोठा सोन्याचा साठा सापडला असून, त्याचे भारतीय रुपयातील मूल्य अंदाजे 7 लाख कोटी रुपये आहे. हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने पिंगजियांग काउंटीमध्ये 40 हून अधिक सोन्याचे परिसर आढळले आहेत, ज्यात 300.2 टन सोने असल्याचा अंदाज आहे.

रॉयटर्सने चीनच्या राज्य एजन्सीच्या हवाल्याने सांगितले की, हुनान प्रांताच्या मध्यभागी ड्रॅगनला 82.9 अब्ज डॉलर्स किमतीचे सोन्याचे प्रचंड साठे सापडले आहेत, जे 600 अब्ज युआनच्या समतुल्य आहे. हुनान अकादमी ऑफ जिओलॉजीने पिंग्झियांग काउंटीमध्ये 2,000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर 40 हून अधिक ठिकाणी सोन्याचा शोध लावला आहे. यामध्ये 300.2 टन सोन्याचे स्त्रोत आहेत. चीनच्या सरकारी एजन्सी शिन्हुआच्या अंदाजानुसार, 3,000 मीटरपेक्षा जास्त खोलीवर 1,000 टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा मिळू शकतो.

चीन सोन्याचा सर्वात मोठा उत्पादक चीन हा जगातील सर्वात मोठा सोने उत्पादक देश आहे. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, 2023 मध्ये जागतिक सोन्याच्या उत्पादनात चीनचे योगदान 10 टक्के आहे. असे असतानाही जागतिक स्तरावर वाढत्या भू-राजकीय तणावानंतर चीनच्या सेंट्रल बँकेने सर्वाधिक सोने खरेदी केले आहे. 2023 मध्ये पीपल्स बँक ऑफ चायनाने सोन्याची खरेदी 20 टक्क्यांनी वाढवली. जागतिक सुवर्ण परिषदेच्या मते, सर्व केंद्रीय बँकांनी 1087 टन सोन्याची खरेदी केली, त्यापैकी चीनने सर्वाधिक खरेदी केली. 2024 च्या पहिल्या तिमाहीत चीनने 280 टन सोने खरेदी केले, तर यावर्षी आतापर्यंत चीन 850 टन सोने खरेदी करेल, असा अंदाज आहे.  

टॅग्स :chinaचीनGoldसोनं