शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

चिनी ड्रॅगन मोठ्या आर्थिक संकटात? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2018 10:23 IST

अनेक कंपन्या डबघाईला आल्यानं आर्थिक संकट गंभीर

बीजिंग: एका दशकापूर्वी जागतिक बाजारात आलेल्या मंदीचा फायदा घेऊन आर्थिक क्षेत्रात जोरदार मुसंडी मारणारा चीन आता मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे. चीनमधील अनेक उद्योग सध्या अडचणींचा सामना करत आहेत. त्यामुळेच आर्थिक धोके टाळण्याला चीनकडून प्राधान्य दिलं जातं आहे. जिंग रोंग जिई (फायनान्शिल वर्ल्ड) संकेतस्थळावर चीनच्या आर्थिक संकटांबद्दलचा एक लेख प्रसिद्ध झाल्याचं वृत्त 'चायनास्कोप डॉट ऑर्ग'नं (chinascope.org) दिलं आहे. चीन त्यांच्या जीडीपीच्या 15 ते 17 टक्के इतका प्रचंड पैसा दरवर्षी व्याज चुकतं करण्यासाठी वापरतो. 'नुकत्याच पार पडलेल्या दहाव्या चायनिज मुलान (महिला) उद्योजक वार्षिक संमेलनात कर्जावरील व्याजाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली. याशिवाय आर्थिक धोके टाळण्याला प्रथम प्राधान्य देण्याबद्दलही चर्चा झाली,' असे माओ झेन्हुआ यांनी जिंग रोंग जिई 'फायनान्शिल वर्ल्ड'सोबत बोलताना सांगितलं. माओ झेन्हुआ चायना चेंगशिन क्रेडिट मॅनेजमेंट कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.'2008 मध्ये जग आर्थिक मंदीच्या गर्तेत सापडलं होतं. या परिस्थितीचा अचूक फायदा उठवत चीननं आर्थिक क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठी आघाडी घेतली. त्यामुळेच जागतिक स्तरावर सर्वाधिक चलन छापण्याचे अधिकारदेखील चीनला मिळाले,' असेही माओ यांनी सांगितले. मात्र आता चीनमधील अनेक उद्योग आर्थिक संकटात सापडल्याचं वृत्त जिंग रोंग जिई (फायनान्शिल वर्ल्ड) आणि 'चायनास्कोप डॉट ऑर्ग'नं दिलं आहे. 'चीनमधील उत्पादनात मोठी वाढ झाली. मात्र उत्पादनाला तितकी मागणी नसल्यानं कंपन्या आर्थिक संकटात सापडल्या आहेत,' असे जिंग रोंग जिई त्यांच्या वृत्तात म्हटलं आहे. 

टॅग्स :chinaचीन