शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

विकृत चीन! भारतातील पेटत्या चितांवरून उडविली खिल्ली; कम्युनिस्ट पार्टीची जगभर नाचक्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 09:26 IST

China Posts Obnoxious Picture Comparing Its Rocket Launch With Burning Indian Pyres: चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतातील कोरोना संकटाची खिल्ली उडविण्यात आली. भारतात चिता जळत आहेत आणि चीन अंतराळात स्पेस स्टेशन तयार करत आहे, असे लिहिण्यात आले होते. 

बिजिंग : भारताला कोरोनाच्या संकटात मदत करण्याचा हात पुढे करून चीन जगासमोर सहानुभूती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे. परंतू चीनचा पुन्हा एकदा विकृत चेहरा समोर आला आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्यांच्या स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या पक्षाने भारताची खिल्ली उडविली. मात्र, हा प्रकार त्यांच्याच अंगलट आला आणि जगभरात चीनला नाचक्कीचा सामना करावा लागला. (The image, titled “China lighting a fire versus India lighting a fire” showed the launch of Tianhe space module and its fuel burnoff compared with a mass outdoor cremation in India )

चीनची सत्ताधारी कम्युनिस्ट पार्टीच्या एका सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतातील कोरोना संकटाची खिल्ली उडविण्यात आली. भारतात चिता जळत आहेत आणि चीन अंतराळात स्पेस स्टेशन तयार करत आहे, असे लिहिण्यात आले होते. 

चीनची मायक्रो ब्लॉगिंग साईट वीबोवर कम्‍युनिस्‍ट पार्टीच्या सेंट्रल पोलिटिकल अँड लीगल अफेअरचे अकाऊंट आहे. यावर हे वादग्रस्त विधान फोटोंसह पोस्ट करण्यात आले होते. यानंतर सोशल मीडियावर कम्युनिस्ट पक्षाला त्यांच्याच लोकांनी घेरले. एका फोटोत चीन रॉकेट लाँच करत असताना दाखविले होते, तर दुसऱ्या फोटोत भारतातील स्मशानभूमीतील पेटत्या चिता दाखविण्यात आल्या होत्या. या फोटोचे कॅप्शन 'चीनमध्ये आग जळणे विरुद्ध भारतात आग जळणे' असे होते. 

लोकांनी चीनच्या या पोस्टवर खूप तीव्र प्रतिक्रिया दिल्या आणि कम्युनिस्ट पक्षावार असंवेदनशील असल्याचे आरोप केले. चीनच्या सरकारी वृत्तपत्राचे ग्लोबल टाईम्सचे संपादक हू शिजिन यांनी लिहिले की, आपल्याला आताच्या काळात भारतासाठी मानवतेचा झेंडा हाती घ्यायला हवा. मात्र, यानंतर हू शिजिन यांचा खरा चेहराही समोर आला. चीनला याचे टेन्शन आहे की, जर चीनने ऑक्सिजन कंसट्रेटर्स आणि व्हेंटिलेटरसारख्या वैद्यकीय वस्तू भारताला दिल्या तर भारत त्याचा वापर गरीबांसाठी करायचे सोडून श्रीमंतांना वाचविण्यासाठी करेल, असे ट्विट केले. एकप्रकारे त्य़ांनी भारतीय यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

भारतासाठी चीनमध्ये 24 तास काम सुरुय...भारतातील चीनच्या राजदूतांनी ग्लोबल टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये दावा केला आहे की, भारताच्या मागणीनुसार चीन मदत करण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करणार आहे. भारताने 40 हजार ऑक्सिजन जनरेटरची ऑर्डर दिली आहे, त्याचे उत्पादन सुरु आहे. चिनी कंपन्या लवकरच भारताला मोडिकल साहित्याचा पुरवठा करतील. यासाठी 24 तास काम सुरु आहे.  

टॅग्स :chinaचीनcorona virusकोरोना वायरस बातम्या