शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

ड्रॅगन संपूर्ण एव्हरेस्ट गिळंकृत करायच्या मार्गावर; नेपाळनं उठवला आवाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2020 07:33 IST

जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे. 

ठळक मुद्देचीनच्या सरकारी टीव्ही चॅनल चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क (सीजीटीएन)च्या अधिकृत संकेतस्थळाने माऊंट एव्हरेस्टची काही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत.तसेच ट्विट करत म्हटले आहे की, "शुक्रवारी माउंट चोमोलुंग्मावरील सूर्यप्रकाशाचे उत्तम दृश्य. याला माऊंट एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे. 

नवी दिल्ली: जगभरात कोरोनानं थैमान घातलेलं असताना चीनच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीयेत. चीनच्या सरकारी टीव्ही चॅनल चायना ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्क (सीजीटीएन)च्या अधिकृत संकेतस्थळाने माऊंट एव्हरेस्टची काही छायाचित्रे प्रकाशित केली आहेत. तसेच ट्विट करत म्हटले आहे की, "शुक्रवारी माउंट चोमोलुंग्मावरील सूर्यप्रकाशाचे उत्तम दृश्य. याला माऊंट एव्हरेस्ट म्हणूनही ओळखले जाते. जगातील सर्वात उंच शिखर चीनच्या तिबेट स्वायत्त प्रदेशात आहे. या छायाचित्रांच्या माध्यमातून संपूर्ण एव्हरेस्टवर चीननं दावा केला आहे. चीन आणि नेपाळमध्ये एव्हरेस्टच्या अर्ध्या भागाचं विभाजनतज्ज्ञांच्या मते, चीन आणि नेपाळ यांनी 1960मध्ये सीमा विवाद सोडविण्यासाठी करार केला होता. त्यानुसार एव्हरेस्टचे दोन भाग केले जातील. त्याचा दक्षिणेकडील भाग नेपाळजवळील तर उत्तर भाग तिबेट स्वायत्त प्रदेशाजवळील असेल. तिबेटवर चीनचा कब्जा आहे.सीजीटीएनच्या ट्विटवर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील चिनी स्टडीजचे प्रोफेसर श्रीकांत कोंडापल्ली म्हणतात, "यात काही नवीन नाही, तिबेट आणि एव्हरेस्टवर चीन कब्जा करून आपलं स्थान अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्नशील आहे. तिबेटकडे एव्हरेस्टचा अत्यंत दुर्गम भाग आहे आणि त्याचा चीनकडून फारसा उपयोग होत नाही. तिथून गिर्यारोहक चढत नाहीत. त्या दिशेने एक मोठी चढण आहे आणि व्हिसा मिळवण्याचीदेखील एक समस्या आहे.5 जी नेटवर्कच्या माध्यमातून संपूर्ण हिमालयावर देखरेख ठेवण्याची योजनाएव्हरेस्टवर 5जी नेटवर्क बसवणार असल्यानं संबंधित तज्ज्ञ चिंतित आहेत. कोंडापल्ली म्हणाले की, चीनने एव्हरेस्टवर 5जी नेटवर्क लावले आहे. ही एक विवादास्पद चाल आहे, कारण कदाचित संपूर्ण हिमालय त्याच्या नियंत्रणाखाली येऊ शकेल. हे 5 जी नेटवर्कदेखील एक सैन्य हालचालींचा भाग आहे, कारण ते समुद्रसपाटीपासून 8,000 मीटर उंचीवर स्थित आहे. यामुळे चीन, भारत, बांगलादेश आणि म्यानमारवर लक्ष ठेवू शकेल. येत्या काही दिवसांत तो या तंत्रज्ञानाचा फायदा हिमालयीन प्रदेशात घेऊ शकेल. एव्हरेस्टवरील बहुतांश मोहीम आणि पर्यटन उपक्रम नेपाळमधील भागातून होतात. आता तंत्रज्ञानाच्या मदतीने चीन तिबेटच्या दिशेने असलेल्या एव्हरेस्टचा काही भाग विकसित करीत आहे. अधिकृत टीव्ही चॅनल वेबसाइटवर चीनने एव्हरेस्टला स्वतःचे घोषित करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चीन अन् नेपाळच्या द्विपक्षीय संबंधात येणार कटुताचीनच्या या महत्त्वाकांक्षी कारणामुळे नेपाळबरोबर असलेल्या त्यांच्या द्विपक्षीय संबंधात कटुता येऊ शकते. नेपाळमध्ये याविरोधात आवाज उठू लागले आहेत. नेपाळचे संपादक आणि प्रकाशक कनक मणी दीक्षित यांनी ट्विट केले की, 'चोमोलुंग्मा-सागरमाथा-एव्हरेस्ट हे नेपाळ आणि तिबेट चीनमधील अर्धे फुटलेले आहे. ”एव्हरेस्टला नेपाळमध्ये सागरमाथा आणि तिबेटमधील चोमोलुन्ग्मा म्हणतात.

टॅग्स :chinaचीनNepalनेपाळEverestएव्हरेस्ट