शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2024 18:49 IST

China Chang e6 mission : यासंदर्भात चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, चांग'ई-6 मिशनला चंद्रावरील दूरवरच्या रहस्यमय भागातील सॅम्पल एकत्रित करून पुन्हा पृथ्वीवर परतण्याचे काम देण्यात आले आहे.

चीनने शुक्रवारी आपले मून रिसर्च मिशन चांग'ई-6 यान लॉन्च केले. स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 05:27 वाजता हे यान लॉन्च करण्यात आले. यासंदर्भात चायना नॅशनल स्पेस ॲडमिनिस्ट्रेशनने माहिती दिली आहे. दिलेल्या माहितीनुसार, चांग'ई-6 मिशनला चंद्रावरील दूरवरच्या रहस्यमय भागातील सॅम्पल एकत्रित करून पुन्हा पृथ्वीवर परतण्याचे काम देण्यात आले आहे. 

महत्वाचे म्हणजे, चिनच्या या यानासोबतच पाकिस्ताननेही आपला उपग्रह पाठवला आहे. मात्र, पाकिस्तानचीनच्या मदतीने भारताची कॉपी करू इच्छित असला तरी, त्याच्या सोबत एक खेला झाला आहे. खरे तर, आर्थिक संकटात सापडलेले पाकिस्तानी नागरीकच पाकिस्तानच्या या मोहिमेविरोध बोलू लागले आहेत. आम्हाला आधी भाकरी हवी आहे, मून मिशनने काय होणार? असा प्रश्न हो नागरिक सोशल मीडियावर विचारत आहेत.

सीएनएसए ने दिलेल्या महितीनुसार, लॉन्ग मार्च-5 वाय-8 रॉकेट, चांग'ई-6 ला घेऊन गेले आहे. चांग'ई-6 अंतराळयानात एक ऑर्बिटर, एक लँडर, एक आरोही आणि एका रिटर्नरचा समावेश आहे. या यानावर आंतरराष्ट्रीय सहकार्याने विकसित 4 पेलोड आहेत. फ्रान्स, इटली आणि यूरोपीय अंतराळ संस्थांचे वैज्ञानिक उपकरण चांग'ई-6 लँडरवर आहे. तसेच पाकिस्तानचा एक छोटा उपग्रह ऑर्बिटरवर आहे.

असा आहे चांग'ई-6 चा उद्देश -  अपोलो बेसिन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इम्पॅक्ट क्रेटरची चांगई-6 मिशनसाठी प्राथमिक लक्ष्य लँडिंग आणि सॅम्पलिंग साइट म्हणून निवड करण्यात आली आहे. जे दक्षिण ध्रुव-एटकेन बेसिनमध्ये आहे. हे यान चंद्रावर सॉफ्ट लॅडिंग करेल. लँडिंगनंतर 48 तासांच्या आत चंद्राच्या पृष्ठभागावरील खडक आणि माती काढण्यासाठी रोबोटिक हातांचा वापर केला जाईल, तर पृष्ठ भाग फोडण्यासाठी ड्रिलचा वापर केला जाईल. नंतर, नमुने कंटेनरमध्ये सील केले जातील आणि आरोही चंद्रावरून उडेल आणि चंद्राच्या कक्षेत ऑर्बिटरसह डॉक करेल. हे संपूर्ण मिशण साधारणपणे 53 दिवस चालण्याची शक्यता आहे, असेही सीएनएसएने म्हटले आहे.

टॅग्स :chinaचीनPakistanपाकिस्तान