शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चीन नाही जिंकू शकणार भारताबरोबर युद्ध ! फक्त दोन्ही बाजूला होईल रक्तपात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2017 17:21 IST

आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही.

ठळक मुद्दे चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. भारतीय लष्करासमोर त्यावेळी चिनी सैन्य पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते.

नवी दिल्ली, दि. 21 - आपल्या लष्करी ताकतीच्या बळावर चीन भले वारंवार युद्धाची गर्जना करत असेल, पण उद्या दोन्ही देशांमध्ये असे युद्ध भडकलेच तर चीनला त्यात कुठलाही फायदा होणार नाही. वरिष्ठ सरकारी पातळीवरील विश्लेषणातून ही बाब समोर आली आहे. डोकलामच्या चिघळत चाललेल्या संघर्षाचे उद्या युद्धात पर्यावसन झाले तर, चीनला प्रादेशिक आणि रणनितीक दोन्ही आघाडयांवर लाभ होणार नाही. फक्त दोन्ही बाजूला  रक्तपात होईल. 

या युद्धातून कोणीही विजेता किंवा पराभूत ठरणार नाही. उलट चीनला 1962 सारखा युद्धाचा निकाला लावता आला नाही तर, आशियातील चीनचे वर्चस्व संपून जाईल. अमेरिकेसमोर चीन दुबळा ठरेल. 62 च्या युद्धानंतर पाचवर्षांनी 1967 सालच्या सप्टेंबर महिन्यात चिनी लष्कराने नाथु ला आणि चाओ ला येथील भारतीय चौक्यांवर हल्ला केला होता. भारतीय लष्करासमोर त्यावेळी चिनी सैन्य पूर्णपणे निष्प्रभ ठरले होते. चीनचा हा हल्ला पूर्णपणे फसला होता. त्यामुळे चीन युद्धाचा धोका पत्करण्याची शक्यता कमीच आहे. 

भारत आणि चीनची सीमा 3488 किलोमीटरमध्ये पसरली असून, युद्धामध्ये कोणा एकाला पूर्ण वर्चस्व मिळवता येणार नाही. डोकलामची भौगोलिक रचना लक्षात घेतली तर, भारताला वर्चस्व मिळवण्याची संधी आहे. सीमेवरच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये भारत चीनपेक्षा मागे असला तरी, युद्ध झालेच तर दोन्ही देशांच्या लष्कराचे नुकसान होईल. 

भारतावर जरब बसवण्यासाठी चिनी लष्कराने तिबेटच्या अज्ञात भागात केला जोरदार युद्ध सरावसातत्याने युद्धखोरीची भाषा करणा-या ग्लोबल टाइम्स या वर्तमानपत्राने आता चिनी लष्कराने अज्ञातस्थळी जोरदार युद्ध सराव केल्याचे वृत्त  दिले आहे. डोकलाम संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हा युद्ध सराव होत असल्याकडेही ग्लोबल टाइम्सने लक्ष वेधले आहे. पिपल्स लिबरेशन आर्मी म्हणजेच चिनी लष्कराच्या पश्चिमी कमांडच्या 10 तुकडयांनी या युद्ध सरावात भाग घेतला होता. भारतीय सीमेला लागून असलेल्या तिबेटमधील चिनी लष्कराच्या तुकडयांचा पश्चिमी कमांडमध्ये समावेश होतो. युद्धसरावाचा व्हिडीओ प्रसारीत करणे हा भारतावर जरब, धाक बसवण्याच्या रणनितीचा एक भाग आहे.  

टॅग्स :chinaचीन