शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

चीन बांधतोय भारताच्या सीमेजवळ ३० विमानतळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2021 13:15 IST

रेल्वे, रस्ते प्रवासाच्या सुविधा वाढवल्या

ठळक मुद्देतिबेटमध्ये चीन खूप वेगाने बांधकामात व्यस्त आहे. नुकतेच त्याने एक हाय स्पीड बुलेट ट्रेनची सुरुवात केली होती. ही रेल्वे तिबेटची राजधानी ल्हासाला न्यिंग-चीशी जोडणारी आहे

बीजिंग : भारतासोबतचा सीमावाद सोडवण्याच्या गप्पा चीन करीत असला तरी तो भारताला लागून असलेल्या सीमेवर स्वत: शक्तिशाली व्हायच्या प्रयत्नांत आहे. ताज्या माहितीनुसार चीन भारताला खेटून असलेल्या तिबेट आणि शिनजियांग प्रांतात जवळपास ३० विमानतळे उभारत आहे. त्यातील काही तयार झाले असून काहींचे काम सुरू आहे. ही ठिकाणे चीनसाठी दूर असली तरी भारताला अगदी खेटून आहेत.

तिबेटमध्ये चीन खूप वेगाने बांधकामात व्यस्त आहे. नुकतेच त्याने एक हाय स्पीड बुलेट ट्रेनची सुरुवात केली होती. ही रेल्वे तिबेटची राजधानी ल्हासाला न्यिंग-चीशी जोडणारी आहे. न्यिंग-ची तिबेटचे एक शहर असून अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ आहे. अरुणाचल प्रदेशचा काही भूभाग आमचा असल्याचा चीनचा दावा आहे. चीनने या भागांत सातत्याने रेल्वे, रस्ते आणि विमान प्रवासाच्या पायाभूत सुविधा वाढवत आहे. त्यामुळे लष्करी जवानांसोबत सामान आणि शस्त्रे लवकर सीमेवर पोहोचवली जाऊ शकतील. 

विमान मार्ग खुले

n    तिबेट आणि शिनजियांग प्रांतासाठी चीनने २३ विमान मार्गही खुले केले आहेत. त्यामुळे नव्या अधिकाऱ्यांना तिबेट आणि शिनजियांगहून आणता येईल आणि तेथे घेऊन जाता येईल. n    याची सुरुवात १ सप्टेंबर रोजी झाली. तेव्हा ११५ वरिष्ठ अधिकारी एका चार्टर्ड फ्लाइटने शिगात्से हेपिंग एअरपोर्टहून (तिबेट) चेंगदू, सिचुआन प्रांतात पोहोचले होते. चिनी भाषेची सक्तीn    तिबेटचा ताबा घेतल्यापासून चीन त्याला पूर्णपणे आपला रंग देऊ इच्छित आहे. n    गेल्या महिन्यात चीनने तिबेटमध्ये चीनची भाषा व प्रतीके लादण्यावर जोर दिला, असे वृत्त आहे.

टॅग्स :chinaचीनXi Jinpingशी जिनपिंगAirportविमानतळ