शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चीननं भारताला पुन्हा डिवचलं; २६/११ च्या दहशतवाद्याला ग्लोबल टेररिस्ट होण्यापासून वाचवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 21:58 IST

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीरला पाकिस्तानने गेल्या वर्षी अटक केली होती

नवी दिल्ली - दहशतवादाबाबत भारताचा शेजारील देश चीनचा खरा चेहरा पुन्हा उघड झाला आहे. दहशतवादी साजिद मीरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश चीनने रोखला आहे. भारत आणि अमेरिकेने मीरला या यादीत स्थान देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, मात्र चीनने त्यावर व्हिटो केला आहे. साजिद मीर हा मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील वॉण्टेड दहशतवादी आहे.

साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादीमिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी चीनने पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी साजिद मीर याला संयुक्त राष्ट्रात जागतिक दहशतवादी म्हणून नामांकित करण्याचा भारत आणि अमेरिकेचा प्रस्ताव रोखला आहे. बीजिंगने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ अल कायदा प्रतिबंध समितीच्या अंतर्गत मीरला जागतिक दहशतवादी म्हणून काळ्या यादीत टाकणे, मालमत्ता गोठवणे, शस्त्रास्त्रबंदी या प्रतिबंधाविरोधात अमेरिकेने सादर केलेल्या प्रस्तावाविरोधात व्हिटो पॉवरचा वापर केला. मीर हा भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील भूमिकेवरून अमेरिकेने त्याच्यावर ५ मिलियन अमेरिकन डॉलरचे बक्षीस ठेवले होते.

२००८ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार साजिद मीरला पाकिस्तानने गेल्या वर्षी अटक केली होती. साजिद मीरला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने १५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दहशतवादाशी संबंधित एका वरिष्ठ वकिलाने सांगितले होते की, जूनच्या सुरुवातीला लाहोरमधील दहशतवादविरोधी न्यायालयाने प्रतिबंधित लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी साजिद मीर याला १५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा टेरर फंडिंग प्रकरणात देण्यात आली आहे.

पाकनं केला होता मीर मेल्याचा दावाडिसेंबर २०२१ मध्ये पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी साजिद मीरचा मृत्यू झाल्याचा दावा केला होता, परंतु अमेरिकेसह पाश्चात्य देशांनी पाकिस्तानवर शंका उपस्थित केली होती. पाकिस्तानने साजिद मीरच्या मृत्यूचे पुरावे सादर करावेत, असे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर पाकिस्तानने अचानक २१ एप्रिल २०२२ रोजी साजिद मीरला अटक केल्याचा दावा केला त्यानंतर १६ मे २०२२ रोजी त्याला शिक्षा सुनावण्यात आली आणि लाहोरच्या कोट लखपत तुरुंगात पाठवण्यात आले. 

टॅग्स :chinaचीन26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाIndiaभारत