शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

चीनने अडवला भारताचा समुद्री मार्ग, जाणून घ्या वाद काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 08:29 IST

या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. 

ठळक मुद्देया कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क : दिवसेंदिवस आर्थिकदृष्ट्या अधिकाधिक शिरजोर होत असलेला चीन आता दक्षिण चीन समुद्रात वाटमारी करू पहात आहे. दक्षिण चीन समुद्री मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक मालवाहू जहाजाची तपशीलवार माहिती देण्याचा दंडक चीनने घातला आहे. १ सप्टेंबरपासून हा नियम लागू झाला असून सर्वच देशांनी याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

वाद काय?n या कायद्याच्या माध्यमातून चीन दक्षिण आणि पर्व चीन समुद्राद्वारे होणाऱ्या परदेशी जहाजांच्या व्यापारावर नियंत्रण आणू पहात असल्याचे जागतिक समुदायाचे म्हणणे आहे. n कायद्याचे उल्लंघन केल्यास चीनकडून कोणती कारवाई केली जाईल, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र, यातून संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. 

दक्षिण चीन समुद्राचे महत्त्वn या समुद्री परिसरातून दरवर्षी २८६ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो.n जगभरातून होणाऱ्या सागरी व्यापाराच्या एक तृतियांश हिस्सा या भागातला आहे. 

काय आहे चीनचा कायदा?आपल्या हद्दीतील समुद्राच्या सुरक्षेचे कारण पुढे करत चीनने १ सप्टेंबरपासून नवीन कायदा लागू केला आहे. त्यानुसार दक्षिण चीन समुद्रातून जाणाऱ्या जहाजांना आपल्याकडील मालाची तसेच वेग, कोणत्या दिशेने जहाज जाणार आहे ते इत्यादी सर्व बारिकसारिक माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या जहाजांवर कारवाई करण्याचे अधिकार हा कायदा चिनी अधिकाऱ्यांना देतो.चीनचा हा कायदा युद्धसामुग्री घेऊन जाणाऱ्या तसेच तेल, नैसर्गिक वायू आणि रसायने इत्यादींची वाहतूक करणाऱ्या जहाजांवर लागू असेल.

 भारतासाठी महत्त्वाचा सागरी मार्गभारताचा ९५ टक्के व्यापार सागरी मार्गाद्वारे होतो. त्यापैकी ५५ टक्के व्यापार दक्षिण चीन समुद्राच्या माध्यमातून होतो. या मार्गावरून भारताचाही १३ लाख कोटी रुपये मूल्याचा व्यापार होतो. जूट, चहा, पोलाद, तांबे व चामडे इत्यादी वस्तूंची निर्यात या मार्गाने केली जाते.

टॅग्स :chinaचीनSea Routeसागरी महामार्गIndiaभारत