शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

चीन व्हेनेझुएलाच्या पाठीशी, किम जोंग यांनी दिली थेट युद्धाची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 12:22 IST

राष्ट्राध्यक्ष मादुरोंना मुक्त करा; चीनची मागणी, ही दादागिरी, सार्वभौम देशावरील हल्ला गंभीर : जोंग 

बीजिंग : इंधन तेलाने समृद्ध व्हेनेझुएलावर मध्यरात्री अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर या देशाची बाजू घेण्यासाठी चीन आणि उत्तर कोरिया हे देश सरसावले आहेत. अमेरिकेच्या ताब्यात असलेले व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांची तत्काळ मुक्तता करण्याची मागणी चीनने केली आहे. तर, उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग यांनी ही अमेरिकेची गुंडगिरी असल्याचे सांगत एका सार्वभौम देशावर केलेला हा सर्वांत गंभीर हल्ला असल्याचे म्हटले आहे. 

कोणताही वाद असला तरी त्यावर तोडगा हा चर्चेच्या माध्यमातूनच काढला जावा, असे चीनने म्हटले आहे. एखाद्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना पकडून आपल्या देशात नेणे सर्वस्वी चुकीचे असल्याचे चिनी परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष मादुरो आपले खास मित्र असल्याचे सांगत जोंग यांनी थेट ट्रम्प यांना जागतिक युद्धाची धमकी दिली आहे. व्हेनेझुएलात आता सत्ता कुणाची? 

अमेरिकी सैनिकांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो व त्यांच्या पत्नीला पकडून अमेरिकेत नेल्यानंतर या देशात नेमकी सत्ता कुणाची, याबाबत नागरिकांत संभ्रम आहे. २.९ कोटी लोकसंख्येच्या या देशात मादुरोंच्याविरुद्ध अनेकदा बंड झाले होते. 

रोड्रिगेज राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत

२०१८ पासून देशाचे उपराष्ट्रपतिपद सांभाळत असलेल्या डेल्सी रोड्रिगेज आता राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीत असून व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयानेही त्यांना तात्पुरती राष्ट्राध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळण्याचे आदेश दिले आहेत. 

संविधान काय सांगते? 

व्हेनेझुएलातील संविधानात असलेल्या तरतुदींनुसार राष्ट्राध्यक्षांच्या अनुपस्थितीत कोणत्याही परिस्थितीत देशात एक महिन्याच्या आत सार्वत्रिक निवडणूक झाली पाहिजे. शिवाय रोड्रिगेज यांचे अमेरिकेतील ‘वॉल स्ट्रिट’शी संबंधित रिपब्लिकन नेत्यांशी असलेले संबंध पाहता निवडणुकीत त्यांचे पारडे जड ठरत आहे. 

जगभर तीव्र प्रतिक्रिया

अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्याच्या तीव्र प्रतिक्रिया जगभर उमटल्या आहेत. चीनने राष्ट्राध्यक्ष मादुरो व त्यांच्या पत्नीची तत्काळ सुटका करावी, अशी मागणी केली आहे. हा प्रकार संयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदीमध्ये नमूद तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे चीनने म्हटले आहे. उत्तर कोरियाने हा प्रकार अमेरिकेची दादागिरी असल्याचे म्हटले. 

विरोधी पक्षनेत्यांवरही लक्ष

व्हेनेझुएलातील विरोधी पक्षनेत्या आणि गेल्या वर्षी शांततेचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो यांच्यावरही आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेकांचे लक्ष आहे. मात्र, देश चालवण्यासाठी आवश्यक पुरेसे पाठबळ मारिया कोरिना मचाडो यांच्याकडे नसल्याने मोठी अडचण आहे. 

हे एक धोकादायक 

अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या व्हेनेझुएलाच्या नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष मादुरो यांच्याविरुद्ध झालेल्या कारवाईबद्दल दक्षिण फ्लोरिडामध्ये आनंदोत्सव साजरा केला. न्यूयॉर्क शहराचे महापौर जोरान ममदानी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोन चर्चा करून हे थेट युद्धकृत्य असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेचा हल्ला हा संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन आहे, असे  डावे पक्षांनी म्हटले आहे. 

भारताने व्यक्त केली चिंता, घडामोडींकडे बारीक लक्ष

भारताने या घटनाक्रमाबाबत तीव्र चिंता व्यक्त करून या घडामोडींकडे  बारीक लक्ष असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने व्हेनेझुएलातील जनतेच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण समर्थन असल्याचे नमूद करून हा वाद शांततेच्या मार्गाने चर्चेतून सोडवला जावा, असे आवाहन केले आहे. 

काँग्रेसने या परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त करून आंतरराष्ट्रीय कायद्याने स्थापित सिद्धांतांचे एकतर्फी कारवाईतून उल्लंघन केले जाऊ शकत नाही, असे काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे. अमेरिकेचा हा हल्ला म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघाच्या संहितेचे गंभीर उल्लंघन असल्याचे भारतातील डाव्या पक्षांनी म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : China backs Venezuela; Kim Jong threatens direct war against US.

Web Summary : China and North Korea support Venezuela after alleged US attack, demanding Maduro's release. Kim Jong threatens war. Venezuela faces political uncertainty. India expresses concern, urging peaceful resolution.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पchinaचीनKim Jong Unकिम जोंग उन