शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

ड्रॅगन आग ओकतोय! चीनकडे सूर्याहून अधिक ताकदवान 'कृत्रिम सूर्य'; तापमान ११९९९९८२ डिग्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2021 11:15 IST

चीननं तयार केलेला कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली

चीनमधून कोरोनाचा विषाणू जगभरात पोहोचला. कोरोना संकटामुळे जगात लाखो जणांचा बळी गेला. देशांच्या अर्थव्यवस्था गाळात गेल्या. मात्र ज्या चीनमधून कोरोनाचा विषाणू जगात सर्वदूर पोहोचला, तिथे आता सर्वकाही आलबेल असल्याचं चित्र आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेला कृत्रिम सूर्य आता आणखी आग ओकू लागला आहे. विशेष म्हणजे हा सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक शक्तीशाली आहे.चीनचा कृत्रिम सूर्य खऱ्या सूर्यापेक्षा जास्त प्रकाश आणि ऊर्जा देईल. मिरर नावाच्या संकेतस्थळानं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्यानुसार कृत्रिम सूर्याचं तापमान तो सक्रिय होताच खऱ्या सूर्याच्या तुलनेत १० पट अधिक होतं. सोप्या शब्दांत सांगायचं झाल्यास, कृत्रिम सूर्य जवळपास १०० सेकंद खऱ्या सूर्यापेक्षा १० पट अधिक उष्ण होता. याआधी कृत्रिम सूर्याचं तापमान १६ कोटी डिग्री सेल्सियसवरदेखील गेलं होतं. कृत्रिम सूर्याचं तापमान १२ कोटी डिग्री सेल्सियसवर जाणं मोठं यश असल्याचं चिनी शास्त्रज्ञांनी सांगितलं.कृत्रिम सूर्याच्या प्रकल्पावर काम करणाऱ्या चिनी शास्त्रज्ञांनी आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. याआधी कृत्रिम सूर्याचं तापमान सलग १०० सेकंद १० कोटी डिग्री सेल्सियसवर ठेवण्यात शास्त्रज्ञांना यश आलं होतं. मात्र आता शास्त्रज्ञांनी हेच तापमान १६ कोटी डिग्री सेल्सिअसवर नेण्यात यश मिळवलं आहे. आता यापुढे रिऍक्टरचं लक्ष्य एक आठवडा तापमान स्थिर ठेवणं असेल, अशी माहिती शेन्जेनमधील विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या भौतिक विभागाचे संचालक ली मियाओ यांनी दिली. आमच्या हाती आलेलं यश खूप मोठं आहे. यापुढे हेच तापमान बराच कालावधीसाठी स्थिर ठेवणं आमचं उद्दिष्ट असेल असं ली यांनी सांगितलं. 

टॅग्स :chinaचीन