शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

China: आता ३ वर्षांच्या मुलांचंही होणार कोरोना लसीकरण, चीननं दिली मंजुरी; ठरला जगातील पहिला देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2021 15:49 IST

चीनमध्ये आता ३ वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना विरोधी लसीला चीननं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे.

चीनमध्ये आता ३ वर्षांच्या मुलांनाही कोरोनाची लस देण्यात येणार आहे. सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना विरोधी लसीला चीननं आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. ३ वर्षांपासूनच्या मुलांना कोरोना विरोधी लस देणारा चीन जगातील पहिला देश ठरणार आहे. चीनमध्ये आता ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांना सिनोवॅक बायोटेकची लस देण्यात येणार आहे. चीनमध्ये सध्या १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनाच कोरोनाची लस देण्यात येत आहे. 

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण जगभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण मोहीम प्रत्येक देशाकडून राबविण्यात येत आहे. चीनमधील सरकारी माध्यमांना एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे चेअरमन यिन वीडोंग यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान, चीन सरकारनं अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबतची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. चीनच्या लसीकरण मोहीमेची जबाबदारी असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

लसीच्या चाचण्या यशस्वीरॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार सिनोवॅक लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यात लहान मुलांच्या शरीरात कोरोना विरोधी अँटीबॉडी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आहे. यासोबतच लसीचे कोणतेही दुष्परिणाम देखील लहान मुलांमध्ये आढळून आलेले नाहीत. पहिला डोस घेतल्यानंतर मुलांमध्ये एका आठवड्याच्या आत १० पट अँटीबॉडी तयार होत असल्याचं अभ्यासातून दिसून आलं आहे. तर १५ दिवसांनी यात वाढ होऊन हेच प्रमाण २० पट होत असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.  

टॅग्स :chinaचीनCorona vaccineकोरोनाची लस