शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

औषधांमुळे बदलला मुलाच्या डोळ्यांचा रंग; कोरोनाच्या उपचारादरम्यान थायलंडमध्ये विचित्र घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 12:06 IST

बँकॉक : कोरोनाच्या उपचारादरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये वैद्यकीय दुष्परिणामांमुळे सहा महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यांचा चक्क रंग ...

बँकॉक : कोरोनाच्या उपचारादरम्यान एक विचित्र प्रकरण समोर आले आहे, ज्यामध्ये वैद्यकीय दुष्परिणामांमुळे सहा महिन्यांच्या मुलाच्या डोळ्यांचा चक्क रंग बदलला आहे. ही घटना थायलंडमध्ये घडली आहे. 

एका दिवसाच्या ताप आणि खोकल्यानंतर सहा महिन्यांच्या मुलामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली. यानंतर बाळाला तीन दिवस फेविपिराविर औषध देण्यात आले, त्यामुळे बाळाची तब्येत सुधारली; मात्र, उपचाराच्या १८ तासांनंतर मुलाच्या डोळ्यांचा रंग बदलला असल्याचे आईला आढळून आले. मुलाच्या डोळ्यांचा रंग उपचारापूर्वी हलका तपकिरी होता तो उपचारानंतर निळा झाला. महिलेने याबाबत तत्काळ डॉक्टरांना माहिती दिल्यानंतर त्यांनी मुलावरील उपचार बंद केले. औषधे बंद केल्यानंतर पाच दिवसांनी मुलाच्या डोळ्यांचा रंग मूळ स्वरूपात परत आला.

२०२१ मध्येही अशीच घटना

२०२१ मध्ये भारतातही अशी घटना घडली होती. फेविपिराविरमुळे २० वर्षांच्या तरुणाचे गडद तपकिरी डोळे निळे झाले होते. २०२२ मध्ये, थायलंडने कोरोनाच्या उपचारांसाठी त्याचा वापर करण्यास परवानगी दिली होती. 

संशोधक काय म्हणाले? चुलाबोहर्न रॉयल अकादमी, बँकॉक, थायलंड येथील संशोधकांनी सांगितले की, मुलाला खोकला आणि ताप आल्यावर उपचार करण्यात आले. त्याला कोरोनाची लक्षणे होती. बाळाच्या आईला थेरपीच्या १८ तासांच्या आत मुलाच्या डोळ्यांचा रंग खराब झाल्याचे लक्षात आले. 

काय आढळले? फेविपिराविर औषधामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाची तब्येत सुधारते. मात्र, रुग्णालयात दाखल न झालेल्या व्यक्तींना औषधाचा फायदा झाला नाही.फेविपिराविरच्या वापराशी संबंधित दुष्परिणाम आहेत. रक्तामध्ये युरिक ॲसिडची पातळी झपाट्याने वाढते. अतिसार आणि  पांढऱ्या रक्त पेशींमध्ये घट होते. डोळे निळे होण्याचा प्रकार दुर्मीळ असला तरीही त्याकडे गांभीर्याने पाहवे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्यmedicineऔषधं