शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांखालील मुलांना टीव्ही पाहण्यास बंदी, स्वीडनमध्ये प्रत्येक वयाच्या मुलांसाठी मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 09:11 IST

Guidelines For children In Sweden: भारतामध्ये १ वर्षाचे लहान मूल रडायला लागले तरीही त्याच्या हातात मोबाइल देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, विकसित असलेल्या स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

स्टॉकहोम - भारतामध्ये १ वर्षाचे लहान मूल रडायला लागले तरीही त्याच्या हातात मोबाइल देऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, विकसित असलेल्या स्वीडनमध्ये दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्ही पाहण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

देशाच्या सार्वजनिक आरोग्य संस्थेच्या मते, स्क्रीनचा वापर शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करत असल्याने लहान मुलांना डिजिटल मीडिया आणि टेलिव्हिजनपासून पूर्णपणे दूर ठेवले पाहिजे. ऑन-स्क्रीन वेळ कमी करण्याच्या या शिफारसी फक्त लहान मुलांसाठी नाहीत तर इतर वयोगटांसाठी स्क्रीन टाइम नियंत्रित करण्याची सरकारची इच्छा आहे. 

१३ ते १६ वयोगटातील स्वीडिश किशोरवयीन मुले शाळेबाहेर पडल्यानंतर दररोज सरासरी साडेसहा तास मोबाइल, टीव्हीवर घालवत आहेत. ८ तासांपेक्षा अधिक वेळ स्क्रीनवर अमेरिकेतील किशोरवयीन मुले घालवत आहेत.

मार्गदर्शक तत्त्वे काय? दोन वर्षांखालील मुलांना मोबाइल, टीव्हीपासून दूर ठेवावे.दोन ते पाच वयोगटातील मुलांना दररोज एक तासापेक्षा जास्त स्क्रीन पाहण्यास देऊ नये.सहा ते बारा वयोगटातील मुलांचा स्क्रीन टाइम दररोज एक ते दोन तासांपर्यंत मर्यादित असावा. तेरा ते अठरा वयोगटातील मुलांनी दोन ते तीन तासांपेक्षा जास्त स्क्रीन वापरता कामा नये.

बेडरूममधून बाहेर ठेवा मोबाइल- सरकारच्या मते, नवीन मार्गदर्शक तत्त्वे मुलांमधील स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न आहे. मार्गदर्शक तत्त्वे केवळ स्क्रीन टाइम कमी करण्याबद्दल नसून, सवयी बदलण्याबद्दलदेखील आहेत. - झोपण्यापूर्वी फोन, टीव्ही पाहू नये तसेच रात्री फोन आणि टॅबलेट त्यांच्या मुलांच्या बेडरूममधून बाहेर ठेवावा, अशीही शिफारस सरकारने केली आहे.

मोबाइल, टीव्हीने काय होतेय? - कौटुंबिक संवाद कमी झाला आहे.- शारीरिक व्यायाम बंद झाला आहे.- पुरेशी झोप होत नाही.- सतत रील्स, शॉर्ट्स पाहिल्याने मानसिक परिणाम- अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात अडचण

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य