शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
3
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
4
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
5
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
6
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
7
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
8
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
9
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
10
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
11
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
12
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
13
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
14
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
15
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
16
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
17
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
18
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
19
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
20
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 17:49 IST

डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली किर्क यांच्या हत्येनंतर त्यांच्या पत्नीने महत्त्वाचे विधान केलं आहे.

Charlie Kirk Murder Case: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आणि उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांची १२ सप्टेंबर रोजी एका कार्यक्रमादरम्यान गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. चार्ली 'द अमेरिकन कमबॅक टूर' कार्यक्रमासाठी युटाह व्हॅली विद्यापीठात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चार्ली एका तंबूखाली माइक धरून बोलत असतानाच अचानक त्याच्या मानेजवळ गोळी लागली ज्यामुळे खूप रक्तस्त्राव झाला आणि ते जमिनीवर पडले. चार्ली यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आता चार्ली किर्क यांच्या पत्नीने त्यांच्या मृत्यूबाबत मोठं विधान केलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे विश्वासू चार्ली कर्क यांची भर कार्यक्रमात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. रविवारी अ‍ॅरिझोनातील स्टेट फार्म स्टेडियममध्ये श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. या कार्यक्रमात चार्ली किर्क यांची पत्नी एरिका कर्क यांनी ते केले जे कोणालाही अपेक्षित नव्हते. एरिका यांनी त्यांच्या पतीच्या हत्येचा आरोपी टायलर रॉबिन्सनला माफ केले आहे. माझे पती चार्ली तरुणाईला वाचवू इच्छित होते. त्या तरुणाला मी त्याला माफ करतो, असं एरिका म्हणाल्या.

चार्ली किर्क यांच्या शोकसभेसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि अमेरिकेच्या मंत्रिमंडळातील वरिष्ठ सदस्य उपस्थित होते. ट्रम्प यांनी किर्क यांना स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारा सैनिक असे म्हटले. 

दुसरीकडे, या कार्यक्रमात बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी डाव्या विचारसरणीच्या शक्तींवर तीव्र हल्ला चढवला. चार्ली कर्क यांना लक्ष्य करण्यात आले कारण ते संपूर्ण अमेरिका ज्या विचारांवर विश्वास ठेवते ते व्यक्त करत होते. बंदूक चार्लीवर रोखण्यात आली होती, पण गोळी आपल्या सर्वांवरच झाडण्यात आली. ही गोळी सत्य आणि स्वातंत्र्याचा आवाज उठवणाऱ्या प्रत्येकावर झाडण्यात आली. डाव्या विचारसरणीचे लोक चार्लीला बदनाम करत आहेत कारण आपण जिंकत होते आणि आपला प्रभाव वाढत होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका