शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत आता आंदोलकांचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 04:52 IST

कोरोनाच्या शटडाऊनमुळे घटनात्मक अधिकार नाकारले जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.

न्यूयॉर्क : अमेरिका एकीकडे कोरोनाच्या संकटाला सामोरे जात असताना देशाच्या काही भागात आंदोलकांचे आव्हान उभे ठाकले आहे. कोरोनाच्या शटडाऊनमुळे घटनात्मक अधिकार नाकारले जात असल्याचा आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे.राजधानीतील आंदोलनकर्त्यांचे आयोजक टेलर मिलर म्हणाले की, सर्व व्यवहार बंद करुन लोकांना घरात राहण्याचा आदेश देऊन राज्याच्या गव्हर्नर यांनी आमचे संवैधानिक अधिकार नाकारले आहेत. मार्चच्या मध्यात वॉशिंग्टनचे गव्हर्नर जेय इनस्ली यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अन्य ठिकाणांप्रमाणेच या राज्यातही आणीबाणी जाहीर केली होती. या आदेशानुसार, रेस्टॉरंट आणि बार बंद करण्यात आले होते. कोणत्याही ठिकाणी अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, आंदोलकांना हे मान्य नाही.मिलर यांचे असे म्हणणे आहे की, राज्याचे संविधान असे सांगते की, शांततेने एका जागी एकत्र येण्याचा अधिकार कधीही काढून घेतला जाऊ शकत नाही. ही अमेरिकी संस्कृती नाही. सामान्य लोकच नाही तर नेतेही याला विरोध करत आहेत. वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रकारे निर्बंध लावण्यात आले आहेत. जवळपास २० राज्यात याविरुद्ध आंदोलन झाले आहे. या आंदोलनात शेकडो ते हजारो लोक सहभागी झालेले दिसून आले. एकीकडे अमेरिकेत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेला असताना दुसरीकडे हे आंदोलने सुरु आहेत.अमेरिकेत कोरोनाची साथ आटोक्यात येत नसताना आणि मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही कमी होत नसताना हे आंदोलक निर्बंध हटविण्याची मागणी करत आहेत. ही मागणी काही नेत्यांकडूनही केली जात आहे.अमेरिकेतील एका सर्व्हेक्षणात असे दिसून आले आहे की, बहुतांश अमेरिकी नागरिक या कडक उपायांच्या बाजूने आहेत. जणेकरुन कोरोनाचा संसर्ग रोखला जाऊ शकेल. विरोध करणाºया अनेक लोकांचे असे म्हणणे आहे की, शटडाउनमुळे आर्थिक नुकसान होत आहे. ट्रम्प २०२० चे झेंडे, टोप्या आणि शर्टस अशा आंदोलनात सर्रास दिसत आहेत. डेमोक्रॅटिक गव्हर्नर्सच्या राज्यांमध्ये आंदोलनात हे स्पष्ट दिसत आहे.>आंदोलनांमागे राजकारण?हार्वर्ड युनिव्हर्सिटीत समाजशास्त्राच्या प्रोफेसर असलेल्या लेखक थेडा स्कोकपॉल यांचे असे म्हणणे आहे की, सरकारबाबत लोकांमध्ये संशय असणे साहजिक आहे. याचे प्रमाण कमी अधिकही होत राहते.गत काही दिवसात आंदोलने वाढली आहेत. याचे पूर्ण कारण आर्थिक नाही. तर राजकीय विचारधारेतून हे होत आहे. राष्ट्रीय स्तरावर हे संघटितपणे केले जात आहे.यामागे विशिष्ट वैचारिक ताकद आहे. मला तर असे वाटते की, आंदोलन करणाऱ्यांमध्ये सहभागी बहुतांश लोक डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका