शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

Cannes 2022: यूक्रेनमधील अत्याचाराविरोधात महिलेचं नग्न होऊ निदर्शन, म्हणाली - स्टॉप रेपिंग अस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 14:10 IST

Cannes 2022 : हे करणाऱ्या महिलेच्या शरीरावर यूक्रेनचा झेंड्याच्या बाजूला 'स्टॉप रेपिंग अस' असा मेसेज लिहिला होता. त्यासोबतच महिलेच्या पायावर लाल रंगही लावला होता.

कान फिल्म फेस्टिवलमध्ये (Cannes 2022) रेड कार्पेटवर शुक्रवारी एक धक्कादायक घटना समोर आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्यक्रमादरम्यान एका महिलेने यूक्रेनमध्ये (Woman strips off her clothes) होत असलेल्या रेप केसेस विरोधात संदेश देण्यासाठी आपले कपडे काढले होते. जॉर्ज मिलरचा सिनेमा 'थ्री थाउजंड इअर्स ऑफ लॉन्गिंग' च्या प्रीमिअर दरम्यान झालेल्या या घटनेमुळे तिथे उपस्थित सगळेच हैराण झाले होते.

हे करणाऱ्या महिलेच्या शरीरावर यूक्रेनचा झेंड्याच्या बाजूला 'स्टॉप रेपिंग अस' असा मेसेज लिहिला होता. त्यासोबतच महिलेच्या पायावर लाल रंगही लावला होता. यूक्रेनमध्ये (Ukraine) महिलांवर होत असलेल्या रेपचा निषेध करण्यासाठी महिलेने या आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मचा वापर करत ' आमच्यावर बलात्कार करू नका' अशी घोषणाही दिली.

घटनेनंतर लगेच कान फिल्म फेस्टिव्हलचे गार्ड सतर्क झाले आणि त्यांनी त्यांचे कोट काढत महिलेचं शरीर झाकलं. अशाप्रकारे यूक्रेनच्या संकटावर पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर असं निदर्शन करण्यात आलं. याआधी यूक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी कान २०२२ च्या सुरूवातीला एक संदेश दिला होता. जेलेंस्की म्हणाले होते की, 'आपल्याला हे सिद्ध करण्यासाठी एका नव्या चार्ली चॅपलिनची गरज आहे की, आज सिनेमा गप्प नाहीये'. 

तसेच यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात होत असलेल्या रेपच्या मुद्द्यावरही भाष्य केलं होतं. ते म्हणाले होते की, गेल्या महिन्यात रशियन सैनिकांच्या ताब्यात असलेल्या भागांमध्ये बलात्कारांच्या अनेक केसेस समोर आल्या आहेत.  

टॅग्स :cannes film festivalकान्स फिल्म फेस्टिवलInternationalआंतरराष्ट्रीयRussia Ukrainयुक्रेन आणि रशिया