शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बेबी पावडरमुळे कॅन्सर, जॉन्सन अँण्ड जॉन्सनला द्यावी लागणार 2672 कोटी रुपयांची नुकसानभरपाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 18:28 IST

नवी दिल्ली, दि. 23 - लहान मुलांची उत्पादने बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला 2672 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अमेरिकेतील कोर्टाने जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला तसे आदेश दिले आहेत. वैयक्तिक प्रकरणात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खटला असल्याचं मानलं जात आहे. कंपनी या निर्णयाला आव्हान देण्याच्या ...

नवी दिल्ली, दि. 23 - लहान मुलांची उत्पादने बनवणारी प्रसिद्ध कंपनी जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला 2672 कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे. अमेरिकेतील कोर्टाने जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीला तसे आदेश दिले आहेत. वैयक्तिक प्रकरणात आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खटला असल्याचं मानलं जात आहे. कंपनी या निर्णयाला आव्हान देण्याच्या तयारीत आहे.जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यानं गर्भाशयाचा कॅन्सर झाल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला होता. ज्यामध्ये कोर्टात महिलेच्या बाजूने निकाल देताना कंपनीला नुकसानभरपाई म्हणून त्या महिलेला 2672 कोटी रुपये देण्याचे आदेश दिले आहेत. कंपनीने कॅन्सरचा धोका असल्याचा इशारा लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या उत्पादनांवर दिला नसल्याचं न्यायाधीशांनी म्हटलं आहे. 

कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर जॉनसन अँड जॉनसनचे प्रवक्ते कॅरोल गुडरिच यांनी असे सांगितले की, पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाला, याचे कोणतेही सबळ पुरावे नाहीत. त्यामुळे आम्ही कोर्टाच्या निर्णयाविरोधात दाद मागू.

गुप्तांगाचा घाम स्वच्छ करण्यासाठी महिला या पावडरचा वापर करत होत्या, ज्यामुळे गर्भाशयाचा कॅन्सर झाला, असं या महिलांचं म्हणणं आहे. पावडर वापरल्यामुळे कॅन्सर झाल्याचा दावा अनेक महिलांनी जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या मुख्यालयात केला आहे. दरम्यान, यापूर्वीही कंपनीचा अशा पाचपैकी चार प्रकरणांमध्ये कोर्टात पराभव झाला आहे. त्यामुळे जवळपास आतापर्यंत कंपनीला 20 अब्ज रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मात्र एवढा मोठा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.

यापूर्वीही द्यावी लागली होती 110 मिलिअन डॉलर्सची नुकसानभरपाई

अमेरिकेतील एका न्यायालयानं या कंपनीला तब्बल 110 मिलिअन अमेरिकन डॉलर्सची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला होता. जॉन्सन अँण्ड जॉन्सन कंपनीची पावडर वापरल्यानं अमेरिकेच्या व्हर्जिनिया प्रांतातील स्लेम्प नावाच्या एका महिलेला कॅन्सरला सामोरं जावं लागल्यानं ही भरपाई देण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे.  केवळ अमेरिकेतच या कंपनीविरुद्ध हजारो खटले दाखल झाले आहेत. जगभरातील दाव्यांची संख्या एकत्र केली तर ही संख्या आणखीच मोठी होईल. 

आलं आणि पुदिना वापरुन घरगुती उपाय - 

आलं आणि पुदिना एकत्र करुन चांगला ठेचा. त्यात थोडं पाणी घाला. हा जाडसर लेप रोज चेहर्‍यावर लावा. काही दिवसांतच चेहरा तर उजळेलच, पण आपल्या त्वचेच्या तक्रारीही दूर होतील आणि चेहर्‍याला थंडावाही मिळेल.  आजीबाईच्या बटव्यातल्या अशाच करामती आपल्या लहान बाळांसाठीही वापरता येतील. त्यासाठी कोणत्याही रासायनिक सौंदर्यप्रसाधनांची गरज नाही. मात्र ही आजीबाई मात्र खरोखरच आपल्या पारंपरिक ज्ञानात निष्णात असली पाहिजे. 

टॅग्स :Courtन्यायालय